शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन अधिकाºयांसह सरकारविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:01 IST

भूसंपादनाचा वाढीव मोबदला प्रकरण : न्याय मिळेपर्यंत लढा देऊ, नरेंद्र पाटील यांची माहिती   

ठळक मुद्देनिवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकरांना दिले मागण्यांचे निवेदन सोबत आणला वडिलांचा अस्थिकलश न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा पत्नी सखुबाई व मुलगा नरेंद्र पाटील यांचा निर्धार 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण (देवाचे) येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीच्या वाढीव मोबदल्या प्रकरणी शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांना वाढीव मोबदल्याबाबत निवेदन दिले. आपणास न्याय मिळालेला नसून आपण तत्कालीन अधिकाºयांसह विद्यमान राज्य सरकारविरूद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांनी सोबत वडील धर्मा पाटील यांचा अस्थिकलशही आणला असून आई सखुबाई याही त्यांच्यासोबत आहेत. महिलादिनी न्याय मागण्यासाठी आपण आल्याचे सखुबाई यांनी निवेदनात नमूद केले आहे.  जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यासाठी पाटील गुरूवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. परंतु डॉ.पांढरपट्टे महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंतुर्लीकर यांना निवेदन सोपविले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुढील लढ्याबद्दल माहिती दिली. विद्यमान सरकारनेही आपणास न्याय दिलेला नाही. जो दिला तो लाजीरवाणा न्याय आहे. त्यामुळे तत्कालीन दोषी अधिकाºयांसह सरकारविरूद्ध वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा तसेच न्याय मिळेपर्यत लढा देण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांची भेट घेण्यासाठी ते अद्याप कार्यालयात थांबून आहेत.