शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शास्ती माफी योजनेत ५ कोटी रुपयांची वसुली; सहा हजार नागरिकांनी भरला थकीत मालमत्ता कर

By भुषण चिंचोरे | Updated: March 1, 2023 17:08 IST

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या शंभर टक्के शास्ती माफी योजनेत ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांची वसुली करण्यात आली.

धुळे :

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या शंभर टक्के शास्ती माफी योजनेत ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांची वसुली करण्यात आली. ६ हजार १४८ नागरिकांनी शास्ती माफी योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ता कराचा भरणा केला.

महानगरपालिकेने ६ फेब्रुवारीपासून शास्ती माफी योजना जाहीर केली होती. शंभर टक्के कर भरणाऱ्या नागरिकांचा दंड माफ करण्याचा निर्णय या योजनेत घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ६ ते १२ फेब्रुवारीपर्यंत शास्ती माफीची योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारीपर्यंत योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार २८ फेब्रुवारीपर्यंत कर भरणाऱ्या नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

साडेतीन कोटी रुपयांचा दंड माफ :६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत शहरातील ६ हजार १४८ नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केला. मालमत्ताधारकांनी एकूण ५ कोटी ७६ लाख २१ हजार २३० रुपयांचा भरणा केला. कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना ३ कोटी ५८ लाख ५० हजार रुपयांचा दंड माफ करण्यात आला आहे.एकूण थकबाकीत ५० टक्के दंड :शहरातील मालमत्ताधारकांकडे एकूण ६६ कोटी रूपये थकबाकी आहे. त्यात तब्बल ३३ कोटी रूपये दंडाची रक्कम आहे. एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यांच्या कालावधीत महानगरपालिकेच्या वसुली पथकाने १८ कोटी रुपयांची वसुली केली तर फेब्रुवारी महिन्यात शास्ती माफी योजना जाहीर झाल्यानंतर ५ कोटी ७६ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.९३१ जणांनी भरली ऑनलाइन थकबाकी :महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर गर्दी होत असल्याने प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीनेही थकबाकी भरण्याची व्यवस्था केली होती. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला, केवळ ९३१ नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने थकबाकी भरली. इतरांनी मात्र प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या भरणा केंद्रावर जात थकबाकी भरणे पसंत केले.

हद्दवाढीच्या गावांमध्ये प्रतिसाद नाही :हद्दवाढीच्या गावातील मालमत्ता कर चालू वर्षातील असल्याने त्यांना शास्तीमाफी योजनेचा लाभ देण्यात आलेला नव्हता. महानगरपालिकेने आकारलेल्या करांना हद्दवाढीच्या गावातील नागरिकांनी विरोध केला आहे. वसुली पथकाने तगादा लावला असला तरी ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.