शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेटरांकडून 10 लाखांची वसुली

By admin | Updated: January 25, 2017 00:25 IST

केबल व्यवसाय : 19 हजार 659 ग्राहकांनी बसविला सेट टॉप बॉक्स

धुळे : शहरातील दोन केबल ऑपरेटरांकडील 15 लाख रुपयांच्या थकबाकीसाठी गेल्या महिन्यात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या पैकी 10 लाख रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश मिळाले. अद्याप पाच लाखांची वसुली बाकी आहे. शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात  आतार्पयत 19 हजार 659 ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविल्याची माहितीही मिळाली. शहरातील थकबाकीदार केबल ऑपरेटरांना थकीत कराचा भरणा करण्यासंदर्भात प्रशासनामार्फत वेळोवेळी सूचना व नोटिसाही देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे कानाडोळा केला जात होता. त्यामुळे धुळे शहर अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी डिसेंबर महिन्यात याप्रकरणी कारवाई केली होती. शहरातील गरुड कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मल्टी सिस्टिम ऑपरेटर (एमएसओ)च्या केंद्रातील पॅचकार्ड सील करण्यात आले होते. त्यामुळे थकबाकीदार दोन केबल ऑपरेटरांकडील ग्राहकांचे केबल प्रक्षेपण थांबले होते. 10 लाखांचा भरणा प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित केबल ऑपरेटर व्यावसायिकांनी 15 लाख रुपयांच्या थकबाकीपैकी टप्प्याटप्प्याने 10 लाखांचा आतार्पयत भरणा केला आहे. उर्वरित रक्कमही लवकरच भरणा करण्याबाबत त्यांनी कळविले आहे. त्यामुळे प्रक्षेपण सुरू केल्याचे सांगण्यात आले. दरमहा 8 लाखांचा महसूल जिल्हाभरातील केबल ऑपरेटरांकडून जिल्हा प्रशासनाच्या करमणूक कर विभागाला दरमहा 8 लाखांचा महसूल मिळतो. ‘सेट टॉप बॉक्स’साठी मुदतवाढ केबल ऑपरेटरांकडून केबल कनेक्शनधारकांची संख्या समाधानकारक दाखविली जात नाही. या मार्गे करचुकवेगिरी होते. ती यापुढे होऊ नये यासाठी राज्य शासनाने केबल डिजिटलायजेशन करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत प्रत्येक केबल कनेक्शनधारकास सेट टॉप बॉक्स बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र त्यासाठी दिलेली मुदत डिसेंबरअखेर संपली. जिल्ह्यात अद्याप बहुतांश केबल कनेक्शनधारकांनी सेट टॉप बॉक्स बसविलेला नाही. त्यात ग्रामीण भागातील बहुतांश केबल कनेक्शनधारकांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील 17 हजार 795  पैकी केवळ 7 हजार 261 केबल कनेक्शनधारकांनीच सेट टॉप बॉक्स बसविले तर अद्याप 10 हजार 734 ग्राहकांनी ते बसविलेले नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यात केबल कनेक्शनधारकांची संख्या 31 हजार 484 एवढी आहे. त्यापैकी आज अखेर्पयत 19 हजार 659 ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसविल्याची माहिती करमणूक कर विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यात शहरी भागातील 12 हजार 398 ग्राहकांचा तर ग्रामीण भागातील 7 हजार 261 ग्राहकांचा समावेश आहे. 4जिल्ह्यात शहरी भागात (फेज 3) 13 हजार 689 तर ग्रामीण भागात 17 हजार 795 (फेज 4) केबल ग्राहक आहेत. त्यांना अनुक्रमे जानेवारी व मार्चअखेर्पयत सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.