शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

चोरीच्या १० मोटारसायकली हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 22:52 IST

स्थानिक गुन्हे शाखा : सोनगीर पोलिसांची संयुक्त कारवाई, बोरीस गावातील चोराला पकडण्यात यश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच सोनगीर पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दुचाकी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत़ त्याच्याकडून चोरीच्या दहा मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत़ तसेच आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे़गेल्या वर्षी सोनगीर पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यातील मोटारसायकल धुळे तालुक्यातील बोरीस येथे गणेश जिभाऊ भिल याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने चोरली असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी मिळाली़ त्यानुसार सोनगीर पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने संशयिताचा शोध घेवून त्याला ताब्यात घेतले़ पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच चोरीच्या दहा मोटारसायकली देखील मिळवून दिल्या़ या मोटारसायकलींची अंदोज किंमती दोन लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले़ तसेच या मोटारसायकली चोरीचे गुन्हे धुळे, नंदुरबार, नाशिक, बीड, पुणे येथे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली़पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे, सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, पोलिस उप निरीक्षक अनिल पाटील, हनुमंत उगले, राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक नथा भामरे, हवालदार सुनील विंचुरकर, संजय पाटील, संदिप थोरात, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, वसंत पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, मायुस सोनवणे, कुणाल पानपाटील, मनोज पाटील, तुषार पारधी, चेतन कंखरे, योगेश जगताप, किशोर पाटील, विजय सोनवणे, विलास पाटील, गुलाब पाटील, केतन पाटील, दिपक पाटील, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली़हस्तगत केलेल्या १० मोटारसायकलींचे इंजिन आणि चेचीस नंबर पोलिसांना मिळाले आहेत़ तसेच पाच मोटारसायकलींचे पासिंग नंबर मिळाले आहेत तर इतर पाच गाड्यांना नंबर प्लेट नाही़ पासिंग क्रमांक असे: एममएच १८ क्यु २४०२, एमएच १८ एआय २६३८, एमएच ३९ एबी ३०३२, एमएच १४ सीआर ५०९९, एमएच १८ बीपी ८३०५़ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी सुरु असून त्याच्याकडून धुळे, नंदूरबारसह राज्यातील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़दरम्यान, नरडाण्यातून एकाच रात्री तीन तर दहिवेल गावातून शिक्षकाची मोटारसायकल चोरीला गेली आहे़ या गुन्ह्यांचा तपास देखील लवकरच लावू असे पोलिसांनी सांगितले़हस्तगत केलेल्या १० मोटारसायकलींचे इंजिन आणि चेचीस नंबर पोलिसांना मिळाले आहेत़ तसेच पाच मोटारसायकलींचे पासिंग नंबर मिळाले आहेत तर इतर पाच गाड्यांना नंबर प्लेट नाही़ पासिंग क्रमांक असे: एममएच १८ क्यु २४०२, एमएच १८ एआय २६३८, एमएच ३९ एबी ३०३२, एमएच १४ सीआर ५०९९, एमएच १८ बीपी ८३०५़

टॅग्स :Dhuleधुळे