शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बालमनांचा पालकांसाठी वास्तववादी अविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 22:56 IST

राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप : अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या बालमनांचे सादरीकरण

धुळे येथील स्त्री शिक्षण संस्थेने प्रकाश पारखी लिखित, केदार नाईक दिग्दर्शित एप्रिल फूल हे बालनाट्य सादर केले. आजकाल शिक्षणाच्या मागे पळताना क्लास-ट्यूशनच्या व्यापात मुलांना खेळायलाही वेळ मिळत नाही. पण १०-१२ वर्षापूर्वी मुलं रविवारी हक्काने हवं तेवढं खेळायची.आईवडील घरी नसल्याची संधी साधून अश्विनी, नूतन, शिल्पा, सुनीता, अनिता या मुली नाटकाचा खेळ खेळतात. त्यांच्या या खेळात शैलेश, दिनेश, मंगेश, नचिकेत हे देखील सामील होतात.या खेळातील गंमती, जंमतीतून उलगडत जाणाऱ्या या बालनाट्यात साहिल काळे, राज कुलकर्णी, राघवेंद्र कचवाह, वेदांत मोरे, प्रणाली कासार, ग्रीष्मा पाटील, पूजा पाठक, समीक्षा भडागे, गायत्री भांडारकर, वैष्णवी कुलकर्णी, पूजा विसपुते या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू चैतन्य जोग (नेपथ्य), सुजय भालेराव (प्रकाशयोजना), जयेश सूर्यवंशी (पार्श्वसंगीत), केतकी म्हस्कर (रंगभूषा), नीता जोशी (वेशभूषा), शीतल भालेराव, शिल्पा म्हस्कर, दिलीप काळे (रंगमंच व्यवस्था) यांनी सांभाळल्यात.धुळे येथील लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थे धनंजय सरदेशपांडे लिखित सुजय भालेराव दिग्दर्शित पडसाद हे बालनाट्य सादर केले. शहरी वातावरणात वाढलेली मुले निसर्गाच्या सान्निध्यात जातात.या नैसर्गिक वातावरणाने त्यांच्यातील जाणिवा व संवेदना कशा जागृत होणाºया या बालनाट्यात, ऋषी, दिव्या, रवी आणि आदित्य हे चार मित्र त्यांच्या जंगलातल्या मित्राला भीमाला भेटतात. त्यासाठी चालत जाताना त्यांना उलगडणारा निसर्ग, पशू, पक्षी यांच्याबद्दलची माहिती यातून नाट्य निर्माण होत जाते.या बालनाट्यात श्रेयस जोगी, वल्लभ ठाकूर, नारायणी सोनार, कार्तिकी ठाकूर, जगदीश वाघ, प्रणय कासार, सिध्देश बाविस्कर या बालकलावंतांनी अभिनय केला.तांत्रिक बाजू सुजय भालेराव (नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा), केतकी म्हस्कर (पार्श्वसंगीत), हितेश भामरे (वेशभूषा), चैतन्य जोग, सिध्दांत मंगळे, राहूल मंगळे, जयेश सूर्यवंशी, हर्षल मराठे (रंगमंच व्यवस्था) यांनी सांभाळली.

टॅग्स :Dhuleधुळे