शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राऊळवाडीतील चोरीप्रकरणी अवघ्या तीन दिवसात उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 15:24 IST

तिघांना केले जेरबंद : शहर पोलिसांची कारवाई

धुळे : शहरातील चितोड रोडवरील राऊळवाडीत चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून घरगुती वापराचे दोन सिलेंडर, रोख रक्कम असे एकूण ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी शहर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात गुन्ह्याची उकल करुन तिघांच्या मुसक्या आवळल्या़ त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमल देखील ताब्यात घेण्यात आला़शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ चितोड रोडवरील राऊळवाडीत अलकाबाई हिरामण मासुळे (३५) यांचे घर आहे़ त्या २९ सप्टेंबरपासून कामांनिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या़ १८ आॅक्टोबर रोजी परत आल्यानंतर घराची जाळी त्यांना तुटलेली दिसून आली़ त्यांनी घरात जावून बघितल्यावर दोन घरगुती वापरायचे सिलेंडर आणि कपाटात ठेवलेले ४ हजार ३०० रुपये असा एकूण ९ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याचे समोर आले़ याप्रकरणी अलकाबाई मासुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची सुत्र हलविली आणि शेखर भटू जाधव, मयूर अरुण कोळवले आणि सनी उर्फ संतोष विनायक सुपले यांना संशयावरुन ताब्यात घेण्यात आले़ त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली़ त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले़ न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे़शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी सुनील पाठक, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, अविनाश कराड यांनी ही कारवाई केली़

टॅग्स :Dhuleधुळे