शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पॉज मशिनला रेशन दुकानदारांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पॉज मशिन वापराचा निर्णय रद्द करावा, दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पॉज मशिन वापराचा निर्णय रद्द करावा, दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे़ग्रामीण विभाग धुळे तालुका स्वस्त धान्य दुकानदार सेवा संस्थेने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून ही मागणी केली़निवेदनात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी एप्रिल महिन्याच्या धान्याचे वितरण पॉज मशिनवर ठसे न घेता वितरीत करण्याचे आदेश शासनाने दिले होते़ आता मे महिन्याचा धान्याचा कोटा प्राप्त झाला असून या धान्याचे वितरण करताना रेशनकार्ड धारकांचे अंगठ्याचे ठसे घ्यावेत असे आदेश केंद्र शासनाने ३० एप्रिलच्या परिपत्रकान्वये दिले आहेत़ ग्राहकांचे ठसे घेतले तर त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ स्वस्त धान्य दुकानदार अतीशय कमी कमीशनवर काम करतात़ पॉज मशिनमुळे या दुकानदारांना लागण झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटूंबावर होईल़ यासाठी लाभार्थ्यांचे ठसे न घेता गेल्या महिन्याप्रमाणेच पॉज मशिनवर दुकानदाराचे ठसे घेवून धान्य वितरणास मुभा द्यावी, अशी मागणी ग्रामीण स्वस्त धान्य दुकानदार सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, तालुकाध्यक्ष विलास चौधरी, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, खजिनदार लक्ष्मण वाघ, सचिव देविदास मोरे, सहसचिव के़ डी़ पाटील, हिम्मत बागुल, चेतन कंखर, कौतिक दंगल यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदारांनी केली आहे़सध्या केशरी रेशन कार्ड धारकांना स्वस्त दारात धान्याचे वितरण सुरू आहे़आत्महत्या अभिप्रेत आहेत का?कोरोनाच्या लढ्यात जिल्हा प्रशासन, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेप्रमाणेच स्वस्त धान्य दुकानदार देखील योगदान देत आहेत़ शासनाने कोणतेही नियोजन न करता धान्य वितरणाच्या योजना जाहीर केल्याने गर्दी उसळली आहे़ लॉकडाउनच्या काळात कुणाचेही अन्नावाचून हाल होवू नयेत यासाठी धान्य दुकानदार जीव धोक्यात घालून धान्याचे वितरण करीत आहेत़ स्वस्त धान्य दुकानदारांनी सुरूवातीलाच संरक्षण कीट आणि विमा संरक्षणाची मागणी केली होती़ परंतु त्याकडे दुर्लख केले़ याउलट आता पॉज मशिनचा आग्रह धरला जात आहे़ या मशिनवर सर्व लाभार्थ्यांचे थंब घेतल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे़ दुकानदार आणि त्यांच्या कुटूंबालाही धोका आहे़ शासनाला स्वस्त धान्य दुकानदारांच्या आत्महत्या अभिप्रेत आहेत का? असा प्रश्न रेशन दुकानदारांचे नेते महेश घुगे यांनी उपस्थित केला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे