शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

छात्रालयातील मुलींच्या मदतीसाठी 14 वर्षापासून रामकथा

By admin | Updated: April 22, 2017 17:12 IST

धुळ्यात तब्बल 14 वर्ष रामकथा सादर करून मिळालेले सर्वच्या सर्व 4 लाख 18 हजार रुपये मानधन एका छात्रालयातील गरीब-अनाथ मुलांसाठी देत शहरातील वैभवनगरमधील वृद्ध महिलेने दातृत्वाचे दर्शन घडविले आहे.

अभिनव उपक्रम : नीला रानडे यांनी केले 108 रामकथेचे 4 लाख 18 हजार रुपये छात्रालयास दानऑनलाईन लोकमत / अनिल मकर धुळे, दि. 22 - सध्याच्या युगात स्वत:च्या मुलांसाठी रात्रं-दिवस कष्ट करून लाखो रुपये खर्च करणा:यांची संख्या कमी नाही, परंतु धुळ्यात तब्बल 14 वर्ष रामकथा सादर करून मिळालेले सर्वच्या सर्व 4 लाख 18 हजार रुपये मानधन एका छात्रालयातील गरीब-अनाथ मुलांसाठी देत शहरातील वैभवनगरमधील वृद्ध महिलेने    दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. सामाजिक भावनेने प्रेरित या महिलेचे नाव नीला रत्नाकर रानडे असे आहे.नागपूर येथे मुलींचा छात्रावासरानडे यांनी 2003मध्ये 108 रामकथा करण्याचा संकल्प केला होता. त्याचवेळी त्यांनी या रामकथेतून मिळणारे सर्व मानधन नागपूर येथील संघमित्रा सेवा प्रतिष्ठानतर्फे चालविण्यात येणा:या धनतोली येथील मुलींच्या छात्रालयास  देण्याचा संकल्प केला. या छात्रालयामध्ये पूर्वाचलमधील गरीब-अनाथ मुलींचा सांभाळ करण्यासह पहिली ते पदव्युत्तर मोफत शिक्षण दिले जाते. मुलगी छात्रावासात दाखल झाल्यापासून तिच्या लग्नार्पयतची सर्व जबाबदारी या छात्रावासातर्फे घेण्यात येते. गुढीपाडवा आणि गणेश उत्सव असे वर्षातून दोन वेळा त्या मानधनाची रक्कम छात्रावासाला जमा करतात. पहिली कथा धुळ्यातरामकथा प्रवचन संकल्पापूर्वी त्यांनी रामायण व रामायणावरील विविध समीक्षांचा गहन अभ्यास केला. 2003मध्ये त्यांची पहिली रामकथा शहरातील गल्ली नं.7 मधील बापूजी भंडारी संस्थान येथे झाली. तर संकल्पपूर्तीची शेवटची रामकथा 22 ते 28 एप्रिल या कालावधीत नागपूर येथील शक्तीपीठ येथे होणार आहे.  एका रामकथेचा कालावधी आठ दिवसाचा असतो. घरगुती, विविध संस्थांकडून आयोजित रामकथांमध्ये त्या प्रवचन देतात. मावशी केळकर यांच्याकडून प्रेरणाया संकल्पासाठी त्यांना राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख मावशी (लक्ष्मी) केळकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली. सुरुवातील नीला रानडे यांनी 60 रामकथांचा संकल्प केला होता. 2010मध्ये तो पूर्ण झाल्यानंतर प्रमिलाताई मेढे यांच्या प्रेरणेने 108 रामकथा करण्याचा संकल्प केला.समाजाला दिशा मिळावीसमाजात लोप पावत चाललेली माणूसकी, वाढता भ्रष्टाचार यातून समाजाची होत चाललेली अधोगती कुठेतरी थांबावी म्हणून त्यांनी रामकथांचा ध्यास घेतला. श्रीरामासारख्या पुरुषोत्तमाचा समाजापुढे आदर्श ठेवावा, श्रीरामाला फक्त परमेश्वर म्हणून न पाहता त्यांच्यातील चांगले गुण समाजाने घ्यावेत या उदात्त हेतूने त्यांनी रामकथांचा संकल्प केला.जीवघेण्या संकटांचा सामनारामकथांच्या चौदा वर्षाच्या काळात अपघात, आजारपण असे अनेक जीवघेणे प्रसंगही त्यांच्यावर आले. परंतू या परिस्थितीतही त्यांनी रामकथांमध्ये कधीही खंड पडू दिला नाही. प्रत्येकवेळी परमेश्वराची साथ मिळत गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांचे पती रत्नाकर रानडे निवृत्त शिक्षक आहेत. मुलगा, सून डॉक्टर आहे. त्यांचेही प्रोत्साहन या उपक्रमासाठी मिळाल्याचे त्यांनी आवजरून सांगितले.  संकल्पपूर्तीनंतरही रामकथांचे प्रवचन सुरूच ठेवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रामकथा कार्यक्रमआतार्पयत त्यांनी नागपूर, परभणी, सोलापूर, उस्मानाबाद, धुळे, रत्नागिरी, अलीबाग, पनवेल, मुंबई, मालाड, जळगाव, नंदुरबार, डोंबिवली, ठाणे आदी विविध जिल्ह्यातून रामकथा केल्या आहेत. तसेच गुजरात राज्यातील बडोदा येथेही रामकथा झाली. इतर भाषेत रामकथा करताना थोडी अडचण येत असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरुवातील या कथांसाठी लोक 51, 201 रुपये असेच मानधन देत. नंतर-नंतर स्वच्छतेचे मनधनात वाढ होत गेल्याचेही त्यांनी सांगितले.शिवणकाम, रांगोळी काढून एकूण 5 लाख देणारवयाच्या 67 व्यावर्षीही त्यांचा समाजबद्दल काहीतरी करण्याचा उत्साह कायम आहे. आतार्पयत त्यांना प्रवचनातून 4 लाख 18 हजार मिळाले आहेत. एकूण 5 लाख रुपये छात्रावासाला देण्याची त्यांची इच्छा आहे. बाकी रक्कम त्या त्यांना अवगत असलेल्या शिवणकला, भरतकाम, रांगोळी यातून मिळणा:या पैशातून देणार आहेत.दरवर्षी पितृ पंधरावडय़ात चिमुकल्यांचा सहभागगेल्या 14 वर्षापासून ते पितृ पंधरावडय़ातील काही दिवस त्या गरीब-अनाथ मुलांबरोबर घालवितात. त्यांच्याबरोबर असताना मन भरून येते, असे नीला रानडे यांनी सांगितले.