लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चा समन्वय आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे़ या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी आग्रारोडवर व्यावसायिकांना केले़ दरम्यान, शहरात सर्वत्र दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे़ धुळयात मराठा क्रांती मोर्चातर्फे आग्रारोडवरील व्यावसायिकांना बंदचे आवाहन करीत रॅली काढण्यात आली़ त्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार प्रा़ शरद पाटील, अतुल सोनवणे, कमलेश देवरे, साहेबराव देसाई, संजय वाल्हे, निलेश काटे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले़ शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत असून बससेवा तसेच शाळाही बंद आहेत़ या बंद दरम्यान शासनाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आई भवानी चरणी जागरण गोंधळ घालून साकडे घातले जाणार आहे़
धुळयात मराठा क्रांती मोर्चातर्फे बंदच्या आवाहनासाठी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 11:35 IST
उत्स्फूर्त प्रतिसाद, बससेवा बंद, शाळांनाही दिली सुटी
धुळयात मराठा क्रांती मोर्चातर्फे बंदच्या आवाहनासाठी रॅली
ठळक मुद्दे-आग्रारोडवर मराठा क्रांती मोर्चाची रॅली-जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद-जिल्ह्यात सर्वत्र शांततेत आंदोलन