शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस गाणी, रंजक कथांनी उपस्थित भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:49 IST

‘मेघ मल्हार २०१९’चे आयोजन: शहर व परिसरातील २१ शाळांचे संघ सहभागी, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : ए आई पावसात मला जाऊ दे...रिमझिम पाऊस पडे सारखा...सुंदर साजिरा सावन आला... यासारखी एकाहून एक सरस पावसाची गाणी त्याचबरोबर देशभक्ती व कोळी गितांवर लहानग्यांनी केलेली नृत्य...तसेच विद्यार्थ्यांनी खडखडीत आवाजात सादर केलेल्या कथाकथनांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. बालकलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराला सर्वांनीच दाद मिळाली. निमित्त होते स्व.ताराबाई मोडक स्मृतिनिमित्त आयोजित ‘मेघमल्हार २०१९’ कार्यक्रमाचे. महाराष्टÑ बालशिक्षण परिषद व स्त्री शिक्षण संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन कै. डॉ. जगन्नाथ वाणी सभागृह, कमलाबाई कन्या शाळा, धुळे येथे करण्यात आले होते. ‘मेघ मल्हार’चे हे तिसरे वर्ष होते. शब्दस्वरांचा अमृतवर्षाव व पाऊसगाणी, गमतीदार रंजककथांच्या विश्वात बालपणीच्या आठवणींना उजाळा देवून बालकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शहर व परिसरातील २१ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या दोन वर्षांपर्यंत झालेल्या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन मान्यवरांच्याहस्ते होते होते. मात्र यावर्षी प्रथमच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्तेच दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलका बियाणी होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या संचालिका मंगला कुळकर्णी होत्या. व्यासपीठावर जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉ. अरूण साळुंखे, रेखा मुंदडा, मुख्याध्यापिका मनीषा ठाकरे, सुलभा भानगावकर, अनघा ओक, अरूणा नाईक, साधना मानेकर, मनीषा जोशी, शिल्पा म्हस्कर, कल्पना मोरे, केतकी म्हस्कर, मनीषा सोनवणे आदी होत्या. प्रथम सत्रात लताबाई आगीवाल बालमंदिराच्या विद्यार्थ्यांनी ‘देस रंगीला रंगीला..’ या देशभक्तीपर गितावर नृत्य सादर करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर जयहिंदच्या चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘रिमझिम पाऊस पडे सारखा..’ हे पाऊस गाणे सादर केले. कमलाबाई प्र. दलाल शाळेच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ‘आला आला पाऊस आला..’, चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘ टप टप टप थेंब वाजती गाणी गातो वारा’ हे गीत सादर केले. तर लताबाई आगीवाल बालमंदिराच्या चिमुकल्यांनी ‘कोळी वाड्याची शान आई तुझे देऊळ’ या गीतावर कोळी नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. ‘ ए आई मला पावसात जाऊ दे..’या गाण्यालाही दाद मिळाली होती. यानंतर चिमुकल्यांनी विविध विषयांवर कथाकथन केले. त्यालाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली. टाळ्या वाजवून अनेकांनी छोट्या कलावंताचे कौतुक केले.यावेळी बोलतांना मंगला कुळकर्णी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायला पाहिजे. तर ऐतिहासिक कथेतून आदर्श पिढी निर्माण करता येते असे रेखा मुंदडे यांनी सांगितले. सकाळच्या सत्राचे सूत्रसंचालन अरूणा पानपाटील, सोनाली धारणे तर दुपारच्या सत्रात सुजय भालेराव, केदार नाईक यांनी सूत्रसंचालन केले. आभार मेघा शुक्ल यांनी मानले. यावेळी निलेश कुलकर्णी, पी.डी. दलाल, सुलभा भानगावकर, निशा मांडे, शोभा जोशी, प्रा. दत्तराज थोरे, प्रा. मनोज बुवा, सीमा दीक्षित यांच्यासह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
टॅग्स :Dhuleधुळे