अग्रगण्य आय.टी. पब्लिकेशन असलेल्या डेटाक्वेस्टद्वारे डेटाक्वेस्ट टी-स्कूल सर्वेक्षण हे विद्यार्थी, पालक आणि नोकरी प्रदान करणारे यांच्या विश्वासास उतरलेले व उद्योग प्रशंसित नामांकित सर्वेक्षण असून देशभरातील टी-स्कूल म्हणजेच तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची तंत्रज्ञान उद्योगातील योगदान व कौशल्ये या आधारावर व्यापक माध्यमातून मूल्यांकन प्रक्रिया करून क्रमवारी प्रदान करते.
गतवर्षी आलेल्या कोरोना महामारीने अनेक समस्या निर्माण केल्या. त्यात शिक्षणक्षेत्रात देखील अनेक बदल झाले. ऑनलाईन परीक्षेचे आयोजन, परीक्षा व लेक्चरदरम्यान व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांवर नियंत्रण, ऑनलाइन लेक्चरसाठी स्मार्ट सॉफ्टवेअर विकत घेणे, प्रात्यक्षिकांसाठी लॅब व्ह्यूसारख्या ॲप्लिकेशनचा वापर अवलंबल्या. या सर्व बाबी व महाविद्यालयातील इतर सोयी-सुविधांचा परिपाक म्हणून भारतातील उत्कृष्ट १०० अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पटेल अभियांत्रिकीचा समावेश झाला.
या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी.पाटील, महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. जे. बी. पाटील, डेप्यु. डायरेक्टर डॉ. प्रमोद देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा. सुहास शुक्ल, विभागप्रमुख प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. प्रवीण सरोदे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा.डॉ. सतीश देसले, ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट प्रमुख मिल्केश जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले