शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कैद्यांना तुरुंगात करणार क्वारंटाईन, प्रवासी व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 17:57 IST

धुळे- कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. संसर्गाबरोबरच जनमानसातील भीतीदेखील वाढली आहे. वातावरण बदलल्यामुळे जरी सर्दी किंवा खोकला झाला तरी ...

धुळे- कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढला आहे. संसर्गाबरोबरच जनमानसातील भीतीदेखील वाढली आहे. वातावरण बदलल्यामुळे जरी सर्दी किंवा खोकला झाला तरी कोरोनाची टेस्ट करावी असे नागरिकांना वाटते . यामुळे स्वॅब देण्यासाठी रुग्णांची झुंबड उडत आहे. कुणाची कोरोना टेस्ट करावी, यासाठी आता राज्य शासनाने नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे.कोविड चाचणी करण्याची गरज असणाºया व्यक्तींची तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. नवीन नियमावली नुसार, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगात दाखल झालेल्या कैद्यांना सर्वप्रथम एक आठवडा तुरुंगातच क्वारंटाईन केले जाणार आहे व एका आठवड्यानंतर त्यांची अँटीजेन टेस्ट करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी व व्यापाऱ्यांना कोरोनाची लक्षणे नसतील तर त्यांची चाचणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.त्वरित उपचारांची गरज असणाºयांची अँटीजेन टेस्टज्या व्यक्तींना इतर उपचारांसाठी त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे अशा रुग्णांची अँटीजेन चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे त्वरित उपचारांची गरज असलेल्या रुग्णांच्या उपचारांबाबत अर्ध्या तासात निर्णय घेणे शक्य होणार आहे.लक्षणे असलेले, बाधित व्यक्तीच्या नजीकच्या संपकार्तील व परदेशातून आलेल्याव्यक्तींची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आली तर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. मयत व्यक्तीची तसेच बाळंतपणासाठी आलेल्या महिलांची अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे.लक्षणे नसणाºया प्रवासी, व्यापाºयांची चाचणी नाहीकोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले व्यापारी, प्रवासी व जिल्ह्यात दाखल होणाºया व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व लक्षणे असलेले विक्रेते, व्यापारी व पत्रकारांची अँटीजेन चाचणी करण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या आहेत. शासनाच्या निदेर्शानुसार कोरोना चाचण्या करणार आहोत.संजय यादव, जिल्हाधिकारीआज ६०० अँटीजेन किट प्राप्त होतील़ उर्वरित २ हजार किट येत्या दोन दिवसात प्राप्त होतील. कंटेनमेंट झोन मधील लक्षणे असलेले व्यक्ती, बाधित रुग्णाच्या दूरच्या व नजीकच्या संपकार्तील व्यक्तीची चाचणी करण्यात येईल. त्यादृष्टीने नियोजन करीत आहोत.अजीज शेख, आयुक्त मनपा धुळे