शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून होणा:या घटबारी धरणाचा खरीपाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2017 11:28 IST

शासनाने आर्थिक मदत न केल्याने येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम सुरू केले होते.

ऑनलाईन लोकमतजैताणे, धुळे, दि. 14 -  ऑक्टोबर 2016मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे माळमाथा परिसरातील प्रमुख जलस्त्रोत समजल्या जाणारे घटबारी धरण फुटले होते. परिणामी, शेतक:यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने येथील परिसरात पंचनामेही केले. लोकप्रतिनिधींनीही आश्वासनांचा पाऊस येथील शेतक:यांसमोर पाडला होता. तरीही शासनाने आर्थिक मदत न केल्याने येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम सुरू केले होते. हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांना खरीप हंगामात फायदा  होणार आहे. डोमकानी, खुडाणे, जैताणे, निजामपूरचे शेतकरी हवालदिल अतिवृष्टीमुळे घटबारी धरणाला मोठे भगदाड पडले. परिणामी, येथील शेकडो एकर शेतजमीन ही जलमय झाली होती. उभी पिके शेतक:यांच्या डोळ्यादेखत वाहून गेली होती. या अतिवृष्टीमुळे डोमकानी, खुडाणे, जैताणे व निजामपूर येथील शेतकरी हवालदिल झाले होते. शासनाकडून मदतीच्या अपेक्षेत असलेल्या शेतक:यांना मदतही लवकर मिळू शकली नाही.1200 एकर जमीन ओलिताखाली येणार धरण बांधण्यासाठी शेतक:यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनातर्फे धरणाच्या बांधकामासाठी लागणा:या खर्चासाठी तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगून हात वर केले. त्यामुळे घटबारी जलसंधारण समितीच्या सदस्यांनी मे महिन्यात खुडाणे येथे धरण नव्याने तयार करण्यासाठी बैठक बोलावली. बैठकीतून धरणाचे काम लोकसहभागातून करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर खुडाणे व परिसरातील 350 ग्रामस्थांनी धरण परिसरात अवजारे घेऊन कामास सुरुवात केली. 21 मे रोजी सुरू झालेले हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. या धरणाचे प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील सुमारे 1200 एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.  लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळे नाराजी घटबारी धरण फुटल्यानंतर लोकप्रतिनिधींनी घटबारी धरण परिसरात येऊन भेटी दिल्या. शेतकरी व ग्रामस्थांचे सांत्वन केले. परंतु, प्रत्यक्षात निधी मिळविण्यासाठी लोकप्रनिधींनी दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधी हे केवळ कामाचे भांडवल करत असल्याचा आरोप  पराग गवळे, धनराज गवळे, नामदेव गवळे, महेंद्र हेमाडे, मधुकर वाघ, विनोद गवळे, देवाजी वंजारी, मिलिंद भार्गव, वासुदेव बदामे, पांडुरंग महाले, पोपट बाविस्कर, राम सोनवणे, कृष्णा भिल आदींनी  केला आहे.300 ट्रॅक्टर काळी माती तर 100 ट्रॅक्टर मुरूम टाकले धरण परिसरात आतार्पयत ग्रामस्थांच्या सहकार्याने 300 ट्रॅक्टर काळी माती व 100 ट्रॅक्टर मुरूम टाकण्यात आला आहे. यासाठी गावातील वयोवृद्ध व्यक्ती व महिलांनीही मेहनत घेतली आहे. हे काम ज्या दिवसांपासून सुरू झाले, ते आजतागायतही सुरू असून त्यात खंड पडलेला नाही, हे विशेष. 2 लाख 70 हजारांची लोकवर्गणी घटबारी धरणाच्या कामासाठी गावक:यांनी केवळ श्रमदान केले नाही, तर लोकवर्गणीतून 2 लाख 70 हजार रुपयांची लोकवर्गणीही जमा केली आहे. परंतु, धरणाचे काम खूप मोठे असल्यामुळे अजूनही आर्थिक व तांत्रिक मदतीची आवश्यकता आहे.