शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ अभियंतांसह पंटरला सुनावली शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 17:06 IST

लाचखोरी प्रकरण : धुळे न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विद्युत रोहित्र बसविण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी १० हजारांच्या लाचखोरी प्रकरणी वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता आणि त्याचा पंटर या दोघांना येथील न्यायालयाने शिक्षा व दंड ठोठावला आहे़ हा निकाल शनिवारी देण्यात आला़ शिंदखेडा तालुक्यातील पथारे येथील शेत गटात मंजूर झालेले विद्युत रोहित्र बसविण्याची प्रक्रिया लवकर करण्यासाठी दोंडाईचा येथील वीज कंपनीचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता महेशकुमार मुलचंद वर्मा यांनी त्यांचा पंटर अर्थात खासगी इसम राकेश बापू कोळी (रा़ रामी, ता़ शिंदखेडा) याच्यामार्फत १० हजारांची लाच स्विकारली होती़ त्यामुळे याप्रकरणी दोघांविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी तपासाअंती दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता़ याप्रकरणी धुळे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते़ याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील पराग पाटील यांनी कामकाज पाहीले त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, न्यायालय कर्मचारी प्रकाश सोनार यांनी वेळोवेळी मदत केली़ खटल्याची सुनावणी न्यायाधीश डॉ़सृष्टी नीळकंठ यांच्या न्यायालयात सुरु होती़ दाखल करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदार तपासल्यानंतर तत्कालीन कनिष्ठ अभियंता महेशकुमार वर्मा याला ३ वर्ष शिक्षा व ४० हजाराचा दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली़ तर, त्याचा पंटर राकेश बापू कोळी याला १ वर्ष शिक्षा व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली़ 

टॅग्स :Dhuleधुळे