शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वादळातील नुकसानग्रस्तांना शेतकºयांना आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:13 IST

धुळे तालुका : आमदार कुणाल पाटील यांची प्रशासनाकडे मागणी

धुळे : वादळी पावसामुळे धुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची भरपाई प्रशासनाने द्यावी अशी मागणी आमदार कुणाल पाटील आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे बुधवारी केली़ त्यांना निवेदन देखील सादर केले़ याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती मधुकर गर्दे, डॉ़ दरबारसिंग गिरासे, गुलाबराव कोतेकर, बाजीराव पाटील, बळीराम राठोड, बापू खैरनार, राजीव पाटील, विकास पाटील, किरण पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते़ जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की धुळे तालुक्यातील ११ जून रोजी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह पाऊस झाला़ वादळामुळे शेतकºयांच्या कांदा चाळीचे नुकसान झाले़ यात लाखों रुपयांचा फटका शेतकºयांना सहन करावा लागणार आहे़ गावातील रहिवाश्यांच्या घराचे पत्रे उडाले़ काहींच्या घरावर वादळामुळे उन्मळून पडलेली झाडे कोसळल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत़ धुळे तालुक्यातील शिरुड, कापडणे, नेर, कुसुंबा, मुकटी या परिसरातील शेतकºयांचे पॉली हाऊस जमीनदोस्त झाल्या़ बोरकुंडसह परिसरातील शेतकºयांच्या पोल्ट्री फार्मचे वादळामुळे पत्रे उडाली़ त्यात नुकसान झाले आहे़ नुकसानग्रस्तांना भरपाई विनाविलंब मिळावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली़ ग्रामस्थांचेही अतोनात नुकसान *धुळे तालुक्यातील तिसगाव परिसरात मंगळवारी दुपारी अचानक जोरदार वादळ सुरु झाल्याने सर्वांचीच त्रेधा उडाली़ वादळामुळे शेतातील ठिंबक सिंचनाच्या नळ्या हवेत उडून गेल्या़ शेतकºयांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले़ *नेर शिवारात वादळामुळे समर्थ कॉलनी, संत गोरा कुंभार पिठाची गिरणीच्या अंगणात वादळामुळे विजेची तार कोसळली़ याठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे़ *बाभुळवाडी येथील बाभुळवाडी येथे राहणारे विकास पितांबर देवरे व वामन राजधर पाटील हे दोन कुटुंब मजुरी करून आपला उद्ररनिर्वाह करतात़ मंगळवारी झालेळ्या वादळामुळे त्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाले़ यामुळे मोठे नुकसान झाले आहे . त्यांना घरात राहणे मुश्कील झाले आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे