धुळे : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान राजगृहावर समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याचा आमदार फारुक शहा यांच्यासह विविध पक्ष, संघटनांनी निषेध केला आहे़राजगृहावरील हल्ल्याचा आमदार फारुक शाह यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे़ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांनी निवेदन दिले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ग्रंथखजिना या वास्तुत जपून ठेवला असल्याने राजगृह संपूर्ण देशाचे ऊर्जास्थान आहे़ मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याचा त्वरीत तपास लावावा़ राजगृहाला कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी आमदारांनी केली आहे़संविधान संरक्षण समितीसंविधान संरक्षण समितीने गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून राजगृहावर झालेल्या घटनेचा निषेध केला़ या गुन्ह्याचा एसआयटीमार्फत तपास करुन सामाजिक सुरक्षा धोक्यात आणल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा़ दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी समितीचे संस्थापक अध्यक्ष हरीचंद्र लोंढे, सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस एस़ यु़ तायडे, अॅड़ रविकांत वाघ, आरपीआय जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, प्रभाकर खंडारे, शंकर थोरात, अनिल दामोदर, राजु शिरसाठ, प्रेम अहिरे, नयना दामोदर, दिपकुमार साळवे, चंद्रमणी खैरनार, सागर ढिवरे, मंगेश जगताप आदींनी केली आहे़भारतीय बौध्द महासभाभारतीय बौध्द महासभेने देखील या घटनेचा निषेध केला़ दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले़ यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास जगताप, शहराध्यक्ष डी़ एच़ लोंढे, उपाध्यक्ष कैलास बाविस्कर, कोषाध्यक्ष मधुकर निकम, जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे, सचिव नाना देवरे, संघटक बापू पाटोळे, रामचंद्र शिंदे, धर्मराज पवार, रोहिदास शिरसाठ उपस्थित होते़राजगृहावर झालेल्या हल्ल्याचे राज्यभर तिव्र पडसाद उमटत आहेत़
राजगृहावरील हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:02 IST