शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे शाहीर कलावंताचे मानधनासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:12 IST

अर्धातास सुरू होते आंदोलन, सीईओंशी विविध विषयांवर केली चर्चा

ठळक मुद्देकलावंताचे तीन महिन्यांपासून मानधन थकीतमानधन तटपुंजे मिळत असल्याची तक्रारमागण्यांचे सीईओंना दिले निवेदन

आनलाइन लोकमतधुळे : गेल्या तीन महिन्यांपासून थकीत असलेले मानधन मिळावे, वृद्ध कलावंताच्या मानधनात वाढ करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे आज दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्य शासनातर्फे वृद्ध  कलावंताना मानधन दिले जाते. मात्र हे मानधनही वेळेत मिळत नाही. कलावंताच्या बॅँक खात्यावर आॅनलाइन मानधन जमा होईल असे सांगण्यात येते. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील वृद्ध कलावंताना मानधन मिळालेले नाही. तसेच नुकतेच जिल्हयातील काही कलावंताची मानधनासाठी निवड केली. मात्र कोणकोणत्या कलावंताची निवड केली आहे, ते देखील सांगतिले जात नाही. शासन प्रतिवर्षी केवळ ६० कलावंताचीच मानधनासाठी निवड करते. ती मर्यादा ३०० पर्यंत असावी. तसेच मानधन १५०० रूपयांवरून ५ हजार रूपये करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली.आपल्या मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या सदस्यांनी आज दुपारी ठिय्या आंदोलन केले. जवळपास अर्धातास हे आंदोलन सुरू होते.मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन हे दालनात आल्याबरोबरत त्यांनी या कलावंताशी चर्चा केली. यावेळी समाज कल्याण अधिकारी हर्षा बडगुजर यादेखील उपस्थित होत्या.ठिय्या आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप, महासचिव नाना वाघ, संजय सोनार, दीपक महाराज, तुका बापू, हिंमत पाटील, वेडूसिंग गिरासे, मुरलीधर महाराज यांच्यासह ३०-४० कलावंत उपस्थित होते.  

टॅग्स :Dhuleधुळे