शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवरील हल्ल्याचा ‘आयएमए’तर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 22:03 IST

जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन  : डॉक्टर संरक्षण कायदा प्रभावीपणे अंमलात आणण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोलकता येथील एन.आर.एस.मेडीकल कॉलेजमधील डॉ. परिबाह मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याचा इंडियन मेडीकल असोसिएशनच्या धुळे शाखेतर्फे  काळ्याफिती लावून निषेध करण्यात आला. तसेच कोलकता महाविद्यालयातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा दिला.आयएमएच्या धुळे शाखेतर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना आज निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात डॉक्टरांवर होणारे हल्ले वाढत चालले आहे. हल्यांपासून खाजगी तसेच सरकारी हॉस्पिटलही सुटलेले नाही. कोलकता येथे एका ८५ वर्षाच्या वृद्धाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही रूग्ण दगावला. त्या बदलाचा राग म्हणून जमावाने एन.आर.एस.मेडीकल कॉलेजमधील डॉ. परिबाह मुखर्जी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, े मृत्यूशी झुंज देत आहेत. या हल्याचा आय.एम.ए.च्या धुळे शाखेतर्फे निषेध करून कोलकता येथील महाविद्यालयातील डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा दिला आहे. दरम्यान २०१० मध्ये पारीत झालेला डॉक्टर संरक्षण कायदा प्रभावीपणे अंमललात आणावा अशी डॉक्टरांनी मागणी केली. तसेच वर्ष २०१६ मध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या सुरक्षेसंदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनाची आजपर्यंत पूर्तता केली नाही. ती पूर्तता करावी अशी मागणी केली. दरम्यान आयएमएतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदार, आमदार यांना पत्र,ई-मेल पाठवून या घटनेचा निषेध केला आहे.निषेध करतेवेळी आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. योगेश ठाकरे, डॉ. सुशील महाजन, डॉ. जया दिघे, डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे