शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पद्मावत चित्रपटास विरोध आमोदेजवळ बस जाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:21 IST

शिरपूर : बस चालक जखमी, प्रवासी सुखरुप; उद्या शिंदखेडा बंद

ठळक मुद्दे चिमठाणे व धुळ्यात रास्तारोको, उद्या शिंदखेडा बंदचिमठाणे आणि धुळ्यातील हॉटेल रेसीडेन्सीजवळ महामार्गावर राजपूत समाज, विविध हिंदू संघटना आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी सकाळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.दरम्यान, २५ जानेवारी रोजी राजपूत समाजाने शिंदखेडा बंदचे आवाहन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर (जि. धुळे) : ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या कारणावरून आमोदे गावाजवळ काहींनी बस जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली़ बसचालक जखमी झाला. सुदैवाने बसमधील प्रवाशी काही क्षणातच बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली़ या घटनेत बसचे लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले़शिरपुरात मंगळवारी  रात्री १०़२५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ शिरपूर डेपोची गाडी क्रमांक एम़एच़२०-बीएल-१३४९ धुळ्याकडे जाण्यासाठी निघाली असतांना मार्गावरील आमोदे गावाजवळ काहींनी बसवर दगडफेक करून काचा फोडल्यात तर काहींनी रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गाडीतील प्रवाशी लागलीच खाली उतरल्यामुळे मोठी दुघर्टना टळली़ मात्र गाडीचालक नंदलाल परबत कंखरे हे जखमी झालेत़ चालक कंखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम, योगेश, राहूल, प्रशांत सह इतर १६ जणांविरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम १२० ब, १४३, १४७, ३४१, ३३७, ३०७, २७ प्रमाणे बस जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़   बसचे एक लाखापर्यंत नुकसान झाल्याचे आगारप्रमुख स्वाती पाटील यांनी सांगितले़