लोकमत न्यूज नेटवर्कचिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे बुराई नदीचे सौंदर्य पुन्हा एकदा खुलत आहे. गेल्यावर्षी चागल्या प्रकारे पावसाळा झाला असून मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे बुराई नदी पात्रात भोई समाजाने डांगर मळा लावला आहे. हा परिसर डांगर मळ्यांनी बहारलेला दिसून येत आहे. बुराई पात्रातील वाळूचा उपसा कमी होवून लावलेल्या डांगर मळ्यांनी पात्राचे संरक्षण होणार आहे.भोई समाजाचा उदरनिर्वाह पारंपारिकरित्या डांगर मळ्यांवर आहे. डांगरसाठी चिमठाण्याचे नाव मध्यप्रदेश, गुजरातसह मुंबई, पुणे, नाशिक, जळगांव पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. डांगर, टरबूज, खिरे, काकडी अशी अनेक प्रकारची फळे येथे लावली आहेत. नदीतील डांगर, टरबूज याचा खूप गोड स्वाद असतो. यामुळे मुंबई, नाशिककडे जाणारे नागरिक डांगर घेण्यासाठी चिमठाणे चौफुलीवर गर्दी करीत असतात. येथील डांगर, टरबूज, काकडी, खिरे यांना उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी वाढत असते. म्हणून या वर्षी नदीमध्ये लावण्यात आलेले डांगर मळे खुलून दिसत आहेत.बुराई नदीत अगोदर खूप मोठ मोठे खडे पडलेले होते. परंतु या हंगामात निसर्गाची साथ असल्याने समाधानकारक पाऊस झाल्याने बुराई नदीत मोठ्या प्रमाणात वाळू आलेली आहे. त्याचा फायदा वाळू माफिया घेत आहेत. तशा वारंवार घटना घडत असताना पण वाळू उपसा बाबतीत चिमठाणे परिसरमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेक वेळा मोठ्या कार्यवाही झालेल्या असून देखील त्यास न जुमानता रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू चोरी सुरूच आहे. वाळू चोरी करणाऱ्याला कोणत्याही अधिकाºयाचा धाक नाही. याला सर्वस्व जबाबदार प्रशासन असून यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी चिमठाणे परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. यावर प्रशासन किती कार्यवाहीसाठी सरसावते हे देखील येणाºया काळात कळेलच. कारण जे डांगर मळे आहेत त्यांना पाणी जर मिळाले नाही तर ते उद्ध्वस्त होतील. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातून केली जात आहे. बुराई पात्रात डांगरमळे लावल्याने वाळू उपशास काही प्रमाणात पायबंद बसेल. मात्र अशापरिस्थितीतही वाळू चोरी झाल्यास या डांगरमळ्यांना धोका पोहचू शकतो.डांगरमळ्यांमुळे नदी पात्रातील वाळूचे संरक्षण होईल. परंतु प्रशासनानेही कारवाई करणे गरजेचे असल्याचे परिसरातून बोलले जात आहे.
डांगर मळ्यांमुळे होणार नदीपात्राचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:14 IST