शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

कॉलन्यांमधील खुल्या जागेवर सार्वजनिक शौचालयाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:53 IST

नागरिक संतप्त : साक्री नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत दर्शवला विरोध

साक्री : शहरातील माधव नगर, बंजारा तांडा, प्रभाकर नगर, विकास कॉलनी या कॉलन्यांच्या परिसरातील रहिवाशांची संमती न घेता तसेच कोणतीही माहिती न देता माधव नगरातील (गट क्र.१८) मोकळ्या जागेवर सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाचा नगरपंचायतीचा प्रस्ताव आहे. मात्र त्यामुळे तेथील नागरिक संतप्त झाले असून गरज नसताना तसेच बालकांच्या आरोग्याचा विचार न करता होणाºया बांधकामला ताबडतोब स्थगिती मिळावी, यासाठी साक्री नागर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन विरोधही दर्शविण्यात आला.माधव नगरातील रहिवाशांसह लगतच्या कॉलन्यांमध्ये राहणाºया सर्व रहिवाशांकडेही मालकीच्या घरांमध्ये प्रत्येकाचे स्वत:चे शौचालय आहे. माधव नगरातील मोकळ्या जागेवर यापूर्वीच बालकांच्या अंगणवाडीसाठी मोठी इमारत उभी करण्यात आली. लहान बालकांसाठी शिक्षणाची ही सोय रहिवाशांच्या संमतीमुळे झालेली आहे. उर्वरित जागेवर बगीचा करण्याऐवजी शैक्षणिक परिसराजवळ सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्याच्या चुकीच्या नियोजनामुळे येथे शिक्षण घेणाºया चिमुरड्यांवर, त्यांच्यासह नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतील, याचा कोणताही विचार नगरपंचायत प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत.नगरपंचायतीचे अभियंता व बांधकाम ठेकेदारांनी येथे येऊन सरळ ‘लाईन आऊट’ टाकण्यास सुरुवात केल्यावर येथील दक्ष नागरिकांनी विचारणा केली. त्यावेळी नगरपंचायतीच्या अभियंत्यांकडून त्यांना याबाबत माहिती कळाली.वास्तविक येथील बंजारा तांड्याच्या दक्षिणेस याआधीच नदीकिनारी सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम झालेले आहे. तेथे साफसफाई नियमित होत नसल्याने अनारोग्याची समस्या निर्माण झाली आहे. तोच दुसरे सार्वजनिक शौचालय याच परिसरात बांधण्याची गरज नसताना नागरपंचायतीला त्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात असून निवेदनातही त्याबाबत उहापोह करण्यात आला आहे.यावेळी रोडू गिरधर पवार, प्रताप राजाराम राठोड , धर्मेश राठोड, रघुनाथ राठोड, उत्तम पवार, संत्राबाई राठोड, सुरतीबाई राठोड, भरत जाधव, जिवराज जाधव, मदन जाधव, सुभाष जाधव, संपत जाधव, बिरबल पवार, वंदना जाधव, अनिल राठोड, इंदल राठोड , शीतल राठोड, भटू पवार, शिवाजी राठोड, युवराज मराठे, मधुकर नांद्रे, जे.के. पाटील, हरदास पवार, प्रताप पवार आदींनी स्वाक्षºया केल्या आहेत. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाºयांनाही पाठविल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे