शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेरला बंद, दलित, आदिवासी समाजबांधवांतर्फे निषेध मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:10 IST

बहुतांश व्यवसाय, दुकाने बंद, महिलांचा लक्षणीय सहभाग 

ठळक मुद्देपिंपळनेर येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाददलित, आदिवासी समाजांतर्फे निषेध मोर्चा, बंदमध्ये सहभागाचे आवाहनबहुतांश व्यवसाय, दुकाने बंद, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त 

पिंपळनेर, ता.साक्री - अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सूचविलेल्या दुरुस्तींविरोधात पिंपळनेर येथे सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. दलित व आदिवासी समाजबांधवांनी सूचविलेल्या दुरुस्तींना विरोध करत सकाळी निषेध मोर्चा काढला व बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारने या दुरुस्तींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचाराची याचिका दाखल करावी या मागणीसाठी आदिवासी, दलित व चर्मकार समाज तसेच अनसूचित जाती व जमातीतील नागरिक सकाळी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी हातात आपापल्या संघटना व पक्षाचे ध्वज हातात घेतले होते. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पिंपळनेर शहरात बहुतांश व्यापार, व्यवसाय व दुकाने बंद आहेत. दरम्यान काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे.  

 

टॅग्स :DhuleधुळेPimpalnerपिंपळनेर