शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सालदारकीला पाऊण लाखाचा भाव फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 09:27 IST

कापडणे : अक्षय तृतीयेला ठरते शेतमजुरांचे साल, ग्रामीण भागात अजूनही परंपरा कायम

ठळक मुद्देशेतकरी व सालदारांच्या दृष्टीने आखाजी महत्त्वाचा दिवसयाच दिवशी ठरवितात शेतकरी वर्षभरासाठी सालदार यंदा सालाचा दर फुटला पाऊणलाख रूपये 

 

दीपक पाटील। लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : खान्देशात अक्षय तृतीयेचे जेवढे महत्व धार्मिक आहे. तेवढेच शेतकरी व शेतमजुरांच्या दृष्टीने वर्षभरातील हा  दिवस महत्वपूर्ण मानला जातो. याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सालदारांची शेतकºयांकडून निवड केली जाते व तडजोडीअंती साल ठरविले जाते. अर्थात वर्षभरातील शेतमजुराच्या कामाचे वेतन ठरते.बदलत्या काळानुसार शेती व्यवसायातही आमुलाग्र बदल झाले. शेती क्षेत्रात नवनवीन सुधारणा झाली. यांत्रिकीकरण व सोयीस्कर अवजारांची निर्मिती झाल्याने कमीत कमी वेळेत, श्रमात व खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. त्यामुळे पुर्वीसारखे सालदारकीला फारसे महत्व राहिले नाही. शेतकºयाच्या शेतात वर्षभर काम करणाºया सालदाराची निवड ही पद्धत काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, अजूनही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूर्वापार चालत आलेली सालदार निवडीची परंपरा ग्रामीण भागात अभावाने दिसून येतेच. कापडणे येथे सालदार निवड करण्यात आली. दर वर्षाप्रमाणे यंदाही सालदाराच्या वर्षभराच्या मजुरीत तीन ते पाच हजारांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी ७० हजार रुपये सालदारकीचा दाम मिळाला होता. यंदा मात्र, एका सालदारासाठी ७५ हजाराचा दाम ठरला.  सालदार व्यवस्था हळूहळू बंद पडण्याला शेतकºयांसमोरील गंभीर प्रश्नच जबाबदार आहेत. सततचा कोरडा दुष्काळ, अवकाळी पाऊस, उत्पादनात घट, शेतकºयांच्या उत्पादीत मालाला किफायतशीर भावाचा अभाव, वाढती मजुरी, पाणीटंचाई, बैलजोडी व त्यांना लागणाºया चाºयांच्या किंमतीत अव्वाच्या सव्वा झालेली वाढ, विजेचा लपंडाव, महागडी बी-बीयाणे, खते, किटकनाशके यांच्या दरात सतत होणारी वाढ, कमी श्रमात कमी वेळात जास्त मजुरी मिळविण्याकडे मजुरांचा कल, हिस्से वाटणीमुळे जमिनीचे सतत लहान लहान होणारे तुकडे आदी बाबींमुळे शेतकºयांना संपूर्ण वर्षभर सालदार ठेवणे परवडत नसल्याने हळूहळू शेती व्यवस्थेतील सालदार निवड काळाच्या पडद्याआड होत आहे.

 

टॅग्स :DhuleधुळेAkshaya Tritiyaअक्षय तृतीया