शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 12:59 IST

चंद्रशेखर बावनकुळे यांची धुळ्यात घोषणा : नागरिकांना मिळणार मोबाईलवर वीजबिल

ठळक मुद्देमहावितरण कंपनी जनसंवाद कार्यक्रममहावितरणची प्रलंबित कामे मार्च 2018 र्पयत मार्गी

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 14 -  अवैध दारू बंद करण्यासाठी मला एसएमएस करा, अवैध दारू रोखण्यासाठी लवकरच ग्रामरक्षक दल नियुक्त करणार असल्याची घोषणा ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात आयोजित महावितरण कंपनीच्या जनसंवाद कार्यक्रमात केली. यावेळी मंत्र्यांच्याहस्ते 13 वीज उपकेंद्रांचे ई भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमास रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ.हीना गावीत, महापौर कल्पना महाले, आमदार अनिल गोटे, आमदार डी.एस. अहिरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबन चौधरी, शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीष महाले आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना ऊर्जामंत्री म्हणाले की, महावितरणची प्रलंबित कामे मार्च 2018 र्पयत मार्गी लावण्यात येतील तसेच यापुढे नागरिकांना मोबाईल अॅपद्वारा वीजबिले उपलब्ध होतील, अशी घोषणा त्यांनी केली.  धुळे जिल्ह्यात आजही 750 कोटींची वीजबिले थकीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास मोठय़ा संख्येने नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.