शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

धुळ्यात रुग्णांची होणारी हेळसांड वेळीच रोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:50 IST

डॉ़ सुभाष भामरे : अटल महाआरोग्य शिबिरानंतर उमटले पडसाद, तातडीची बैठक

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांनी घेतली अचानक बैठकडॉक्टरांना सल्ला देत केली कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अटल महाआरोग्य शिबिरातील रुग्णांच्या पुनर्तपासणीकडे डॉक्टरांनी वेळीच लक्ष द्यावे़ तालुका आणि ग्रामीण स्तरावरुन रुग्णांची माहिती घेत त्यांची कोणत्याही प्रकारची हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सूचना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी बैठकीत दिल्या़ दरम्यान, शिबिराच्या माध्यमातून दाखल रुग्णांची डॉ़ भामरे यांनी प्रत्यक्ष भेटून चौकशी केली़ अटल महाआरोग्य शिबिरात सहभागी रुग्णांची हेळसांड होत असल्याचे सांगत हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी शिवसेनेने आंदोलन करत आरोग्य प्रशासनाला जाब विचारला होता़ त्या अनुषंगाने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी शनिवारी अचानक बैठक बोलाविली होती़ त्यात त्यांनी आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करत सूचनाही दिल्या़ यावेळी आमदार स्मिता वाघ, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, डॉ़ जितेंद्र ठाकूर यांच्यासह अन्य कार्यकर्ते तसेच प्रभारी अधिष्ठाता डॉ़ अरुण मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ राजकुमार सुर्यवंशी तसेच अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते़ डॉ़ भामरे यांनी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात भेट देत विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली़ त्याच्या सुरुवातीला अटल महाआरोग्य शिबिरातील रुग्णांची आणि त्यांच्या पुनर्तपासणीचे पुढे काय झाले, काम कुठपर्यंत आले असा जाब विचारत आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कौतूक केले़ याठिकाणी जो काही गोंधळ शुक्रवारी उडाला होता, तसा प्रकारचा गोंधळ पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असेही त्यांनी सांगितले़ रुग्णालयात येणाºया प्रत्येक रुग्णाला सेवा मिळावी़ त्यात कोणत्याही प्रकारची हयगय होऊ देवू नका़ समन्वय समितीचे गठन करुन रुग्णांच्या सोईसाठी ठिकठिकाणी बूथ कार्यान्वित करण्यात यावेत़ आवश्यकता भासल्यास अभ्यागत मंडळ समितीच्या सदस्यांचे सहकार्य घेण्याचेही त्यांनी सूचित केले़ तसेच रुग्णांचे नियोजन तालुका निहाय करण्यात यावे़ त्याची जबाबदारी तालुका आणि ग्रामीण पातळीवरील आरोग्य विभागातील कर्मचाºयांवर सोपविण्यात यावी़ ही जबाबदारी संबंधितांनी पार न पाडल्यास त्यांची नावे आम्हाला कळवा, असेही त्यांनी सूचित केले़ दरम्यान, अभ्यागत समितीची बैठक होण्यापुर्वी चार दिवस अगोदर अजेंडा पाठविण्यात येईल़ त्यावेळेस सर्वच विभागांची पाहणी, तपासणी केली जाईल़ सविस्तर आढावा घेऊ असेही भामरे यांनी सुचित केले़

टॅग्स :Dhuleधुळेhospitalहॉस्पिटल