नेर येथे महर्षी वाल्मीकी ऋषी, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने नेर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील कोळी गल्लीतील महर्षी वाल्मीकी ऋषी मंदिरापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. मिरवणूक भवांगीर महाराज, रायवट आदिवासी वस्ती, नेर-म्हसदी फाटा परिसर, ते महात्मा फुले चौक, माळी गल्ली मेन रोड, गांधी चौक, जैन गल्ली, आंबेडकर चौक, बाजारपेठमार्गे मोठ्या उत्साहात काढली. महर्षी वाल्मीकी ऋषी मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. येथील वाल्मीकनगरातील पांझरा नदीच्या काठी महर्षी वाल्मीकी ऋषी यांचे मोठे मंदिर साकारण्यात आले आहे. या मंदिरात २६ ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत पारायण सप्ताह आयोजित केला आहे. महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी सत्कार सोहळा व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या वेळी आदिवासी कोळी समाजातील पंच कमिटी अध्यक्ष नवल न्हानू जगदाळे, बन्सीलाल भावडू कोळी, गुलाब कोळी, विजय निकुंभे, पोलीस पाटील राजेंद्र मगरे, छोटू कोळी, जितू कोळी, किरण कोळी, प्रमोद कोळी, दादा कोळी, पवन कोळी, संजय बाबूलाल कोळी, विनोद कोळी, भैया निकुंभे, पत्रकार दिलीप साळुंखे, बापूजी अखडमल, पितांबर कोळी व सर्व गाव परिसरातील महर्षी वाल्मीकी भक्त कोळी समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेर येथे महर्षी वाल्मीकी ऋषी मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST