धुळे : शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोडीं होते़ रस्ते मोकळे करण्यासाठी अधिकऱ्यांनी खासदार किंवा महापौर यांच्या दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी, असे आदेश आमदार डॉ़ फारूख शहा यांनी दिले.गुलमोहर विश्रामगृहात मनपा व शहर वाहतूक शाखेची आढावा बैठक शुक्रवारी घेण्यात आली़ यावेळी उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक उपायुक्त शांताराम गोसावी, शहर वाहतूकी शाखेचे पोलिस निरीक्षण गणेश चौधरी, प्रदीप चव्हाण, युसुफ पिजांरी, हमीद शहा, परवेश शाह आदी उपस्थित होते़ शहरातील आग्रारोड, पारोळा रोड सुभाष पुतळा, पाच कंदील, मालेगाव चौफुली, पाच कंदील, दत्त मंदिर परिसरातील रस्ते फेरीवाल्यांनी अडविले आहे़ मनपाकडून रस्त्यावर बसणाºया फेरीवाल्याचे साहित्य जमा केली जात नाही़ त्यामुळे कारवाईनंतर पुन्हा रस्त्यावर अतिक्रमन होते़ समस्या कायमची सोडविण्यासाठी वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी सकाळी व सायंकाळी रस्त्यावर फेºया माराव्यात व मनपा अतिक्रमन विभागाच्या अधिकाºयांनी शहरातील अवैध बांधकामासह फेरीवाल्याचे साहित्य जप्त करा़ कारवाई करतांना खासदार किंवा महापौर यांच्या फोन जरी आला तरी दबावाला बळी पडता कारवाई करा, अन्यथा अधिकाºयांविरोधात निलंबित करण्याची मागणी करणार असेही डॉ़ शाह यांनी सांगितले़
वाहतूक समस्या सोडविण्यासाठी दबाव झुगारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:26 IST