शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धर्मा पाटील यांच्या जमिनीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 17:49 IST

विखरण : वाढीव मोबदल्यासाठी तीन दिवसात दुसरा अहवाल देणार

ठळक मुद्देसानुग्रह अनुदानासाठी फेर अहवाल देणार शासन आदेशानुसार आतापर्यंत जमीन संपादनाची प्रक्र्रिया कशी झाली?, धर्मा पाटील यांना किती मोबदला दिला, याविषयी अहवालात माहिती देण्यात आली आहे.येत्या तीन दिवसात धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना वाढीव सानुग्रह मोबदला देण्यासाठी फेर अहवाल पाठविण्यात येणार असून या अहवालात नेमकी त्यांनी कोणती पिके घेतली? त्याचे स्पष्टीकरण देण्यात येऊन तसा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील धर्मा पाटील यांच्या जमीन संपादनाचा वस्तुनिष्ठ अहवाल  तयार करण्यात आला आहे.  परंतु, या अहवालावर सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची स्वाक्षरी न झाल्याने हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अहवालावर स्वाक्षरी न झाल्यामुळे मंगळवारी हा अहवाल जिल्हाधिकाºयांच्या स्वाक्षरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदखेडा तालुक्यातील मेथी-विखरण शिवारात औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले होते. परंतु, विखरण येथील धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचा कमी मोबदला मिळाला होता. त्यासाठी त्यांनी प्रशासकीय व शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता.  मात्र,  त्यांना न्याय मिळत नव्हते. न्याय मागण्यासाठी ते गेल्या महिन्यात मंत्रालयात गेले होते. तेथेही त्यांच्या पदरी निराशा पडल्याने त्यांनी नैराश्यात येऊन त्यांनी  मंत्रालयातच विष प्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मुंबईतच त्यांचे निधन झाले होते. वाढीव मोबदल्यासाठी अहवाल सादर करण्याचे  होते आदेश धर्मा पाटील यांच्या निधनानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने त्यांच्या जमीन संपादनाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्रालयस्तरावर झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने  कृषी विभागाला आदेश देत अहवाल तयार करून घेतला.  या अहवालात धर्मा पाटील यांच्या विखरण शिवारातील गट क्रमांक २९१/२ अ याठिकाणी पाच एकर शेत जमीन संपादनाची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. जमीन संपादनाची प्रक्रिया कधी व कशी झाली? त्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. जमीन संपादनाच्या प्रक्रियेनंतर धर्मा पाटील यांना ४ लाख ३ हजार रुपये १७ मार्च २०१५  रोजी देण्यात आल्याचे प्रशासनाने अहवालात म्हटले आहे. हा अहवाल स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकाºयांच्या स्वाक्षरीसाठी देण्यात आला होता. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत त्याच्यावर स्वाक्षरी न झाल्याने अद्याप पर्यंत अहवाल शासनाकडे पाठविण्यात आलेला नाही.