शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत रोषणाईसह नवरात्रोत्सवाची तयारी पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:14 IST

एकविरादेवी मंदिर : विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, दर्शनासाठी होणार गर्दी

धुळे : खान्देश कुलस्वामिनी एकविरादेवी मंदिरात २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत शारदिय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे़ या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे़नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत़ त्यात २९ सप्टेंबरला पहाटे   देवीची काकडा आरती, ८ वाजता घटस्थापना केली जाईल़ दुपारी १२ वाजता महापूजा व महाआरती  होईल़ दररोज दुपारी बारा वाजेच्या महाआरती नंतर साबुदाणा  खिचडीच्या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे़ नवरात्र उत्सवाच्या काळात दररोज ५ महाआरतींचे आयोजन करण्यात आले आहे़ प्रत्येक महाआरतीचे यजमानपद भाविकांना दिले जाणार आहे़ ललिता पंचमी ३ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता १०१ कुमारी पूजन, रविवारी ६ आॅक्टोबरला नवचंडी यज्ञ व पुर्णाहुती, ७ आॅक्टोबरला महानवमी व सुवासिनी पूजन, ८ आॅक्टोबरला विजया दशमी सिमोलंघन, १३ आॅक्टोबरला कोजागिरी पोर्णीमा उत्सवा निमित्त   दुपारी बारावाजेच्या आरती नंतर मंदिर परिसरात भगवतीदेवी पालखी सोहळा, शंखतिर्थ, संध्याकाळी गोरज मुहूर्तावर ५६ भोग नैवेद्य, देवीचा जागरण गोंधळ  आयोजित करण्यात आला आहे़ नवरात्रोत्सवाच्या काळात गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड  संपूर्ण महाराष्ट्रातून व दक्षीण भारतातून ही भावीक दर्शनासाठी येत असतात. अशा वेळी दर्शनासाठी भावीकांची  गैरसोय होऊ नये म्हणून नियोजन करण्यात आले आहे. अपंग बांधवाना दर्शनासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे़ सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवाच्या संपूर्ण दहा दिवस मंदिर दर्शनासाठी चोविस तास खुले राहणार आहे़ विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे