शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारांमध्ये खरीप हंगामाची तयारी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 21:46 IST

शिरपूर तालुका : मशागतीच्या कामांसह ठिबक नळ्या अंथरण्याची लगबग, कापूस लागवडीला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कतºहाडी : शिरपूर तालुक्यातील त-हाडी, वरूळ, भटाणे, जवखेडे, लोंढरे, त-हाड कसबे, भामपुर, विखरण परिसरात शेतकऱ्यांनी खरीप पूर्व हंगामाच्या कापूस पीक लागवडीसाठी तयारी सुरु केली आहे.तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला असताना शेतकऱ्यांसह शेतमजूरांची कुटूंबे कापूस लागवडीसाठी ठिबकच्या नळ्या अंथरण्यात व्यस्त आहेत़ शेतशिवारांमध्ये मशागतीच्या कामांसह पेरणीच्या तयारीची लगबग सुरु आहे़बाजारात बीटी कपाशी बियाणे दाखल होऊन प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध झाली आहेत. सध्याच्या परिस्थितीत त-हाडी परीसरात कुपनलिकांची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतात पाणी टंचाईची समस्या शेतकºयांना जाणवत आहे. यासाठी शेतकºयांनी पिकांना चारीद्वारे पाणी न देता कमी पाणी असल्याने ठिबक सिंचन करण्यास यंदा पसंती दिली आहे.ठिबक पद्धतीने कापूस पिकाला पाणी दिल्याने कमी पाणी लागते व शेतात तण, अनावश्यक गवत जास्त उगवत नाही. निंदणी कोळपणी खर्च कमी येतो. तसेच ठिंबकने बागायती केल्यास जमीनीची धूप होत नाही. त्यासाठी ज्या शेतकºयांकडे पाण्याची बºयापैकी सोय आहे अशा शेतकºयांनी आपल्या शेतात कापूस पीक लागवडीसाठी व अन्य शेती पिके घेण्यासाठी नवीन ठिबक सिंचन लावण्याची धावपळ सुरु केली आहे. सध्या शेतात ठिबक सिंचन करणाºया प्रत्येक शेतकºयास शासनातर्फे ५० टव्के अनुदान दिले जाते. त्यामुळे सर्वच शेतकºयांचा कल याकडे वाढला आहे.ठिंबक अंथरण्यासाठी मजुरी जास्त असल्याने मजूर न लावता कुटुंबातील सदस्यच कामे उरकताना दिसत आहेत़ चागल्या गुणवत्तेचे व नामांकित कंपनीच्या नळ्या खरेदी करुन शेतात एक बिगा शेतीसाठी ठीबकला ४० ते ५० हजारापर्यंत खर्च येतो. तरी देखील शेतकरी त्याला प्राधान्य देताना दिसतात़

टॅग्स :Dhuleधुळे