शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व पावसाने शेतात साचले तळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 22:27 IST

कापडणे : कापूस बियाणे खराब होण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : लोणकुटे शिवारात बुधवारी दिवसा व रात्रभर झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतात पाणी साचले. शेतात कापूस लागवड करण्यात आलेली आहे. या पाण्यामुळे बियाणे खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.३० व ३१ मे रोजी तापमानाचा पारा ४४ ते ४५ अंशावर होता. मात्र, १ जून रोजी सर्वत्र ढगाळ वातावरण झाले. १ व २ जून रोजी कापडण्यासह परिसरात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे शेतकºयांची खरीपपूर्व हंगामाची तयारी करण्यासाठी धावपळ सुरु होती. १ जून पासून मान्सून केरळमध्ये दाखल येण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनपूर्व पाऊस झाला. ३ जून रोजी संपूर्ण दिवसभर व रात्रभर अधून-मधून पाऊस सुरु होता.बागायतदार शेतकºयांनी २० ते २५ मे नंतर खरीपपूर्व कापसाची लागवड केली आहे. मात्र, ३ जून रोजी झालेल्या पावसाने शेतात कापूस लावलेल्या सर्व चाºया पाण्याने तुडुंब भरल्या.नुकतीच कापूस बियाण्यांची लागवड केलेली असल्याने जमिनीतील कापूस पिकाचे बियाणे सडून खराब होऊ शकतात. मात्र, काही मोजक्या शेतकºयांच्या उतार भागात शेतातच पावसाचे पाणी साचलेले दिसून येत होते.कापडण्यासह धनुर, लोणकुटे, दापोरा, दापोरी या शिवारातील शेत जमिनीत नुकतेच लागवड केलेल्या कापूस पिकाच्या चाºयांमध्ये पावसाचे पाणी साचलेले दिसून आले. यामुळे शेतकºयांनी खरीपपूर्व हंगामात लागवड केलेल्या कापूस पिकाच्या बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पाण्याचा निचरा होऊ न शकल्यास शेतकºयांना आर्थिक फटका बसू शकतो, अशी चिंता शेतकºयांमध्ये आहेगुरुवारी ४ रोजी पावसाने उघडीप दिल्याने वातावरण कोरडे होते. यामुळे शेतकरी बागायती कापसाची लागवड करण्यासाठी शेतात कामे करतांना दिसून येत होते तर काही शेतकरी खरीपपूर्व हंगामातील कोरडवाहू शेती मशागतीची कामे करताना दिसून आले.कोरोनाच्या भीषण संकटाने देश हवालदिल झालेला असताना यंदा नैऋत्य मौसमी पाऊस भारतात ठरल्यावेळी येईल आणि भरपूर कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.१ जून रोजी भारतीय उपखंडाच्या अगदी दक्षिणेकडे केरळ किनाºयावर नैऋत्य मौसमी पाऊस ठरल्यावेळी दाखल झाल्यामुळे महाराष्ट्रातील पुणे शहरात देखील १० जूनपर्यंत नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.कोरडवाहू शेतकरी खरीपपूर्व शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. तर काही शेतकरी बागायती कापूस लागवडीची कामे उरकताना दिसून येत आहेत. शेतकºयांना आता नैऋत्य मौसमी पावसाचे आगमन केव्हा होईल, याची प्रतीक्षा लागली आहे. येणारा खरीप हंगाम चांगला जावो, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली.

टॅग्स :Dhuleधुळे