धुळे : शहरातील जुने धुळे परीसरातील आदर्श व्यायाम शाळा जवळ शुक्रवारी दुपारी संचारबंदी लागू असताना एका प्रार्थना स्थळावर सामूहिकरित्या गर्दी करणाऱ्या ३७ नागरीकांना आझादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, धुळे शहरासह जिल्ह्यात बंदोबस्तासाठी जालना येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या धुळ्यात गुरुवारी रात्री दाखल झाल्या़ त्यापैकी दोन तुकड्या धुळे शहरात तर एक तुकडी शिरपूर येथे शुक्रवारी तैनात करण्यात आली़कोरोना संसर्गजन्य विषाणु असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्याची लागण होण्याची शयक्यता असते. याकरीता नागरीकांनी एकाच ठिकाणी जास्त संख्येने गोळा होऊ नये यासाठी धार्मिक प्रार्थनास्थळे बंद करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारने दिले होते. मात्र या आदेशाला हरताळ फासत शुक्रवारी जुने धुळे परीसरातील आदर्श व्यायाम शाळा जवळील एका धार्मिक स्थळावर नागरीक मोठ्या संख्येने प्रार्थना करण्यासाठी दाखल झाल्याची माहिती आझाद नगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धार्मिक स्थळाची तपासणी असता तेथे पोलिसांना एकुण ३७ नागरीक दिसुन आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भूजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझाद नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सय्यद, रोशन निकम, पोलीस कर्मचारी चेतन सोनवणे, सागर सोनवणे, महेश मोरे, रमेश गुरव, अविनाश वाघ यांच्यासह रॅपीड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी केली. दरम्यान, अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण होते़ पोलीस देखील तैनात करण्यात आले होते़ही कारवाई झाली तेव्हा प्रार्थना स्थळ परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ परंतु पोलिसांनी वेळीच त्यावर नियंत्रण मिळविले़सदर घटनेनंतर जुने धुळे परिसरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे़
सामुहीकपणे प्रार्थना करणारे ३७ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 12:56 IST