शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

खेड्यात पपई विक्री करून पैसे कमविण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:35 IST

सोनगीर : मुस्लिम समाजबांधवाच्या बैठकीत एकमताने घेतलेला निर्णय

न्याहळोद : शेतकऱ्यांनी वर्षभर खर्च व मेहनतीने पिकविलेली फळे ग्राहकांअभावी फेकून देत आहेत. शहरात कुठे पोलिसांचा मार खावा लागतो तर दिवस भर ग्राहक संचारबंदीत येत नाही. त्यामुळे बरेच शेतकरी आपले फळ फेकून देत आहेत तर कुठे फुकट वाटत आहे. अशा परिस्थितीत रोकडे कुटुंबियांनी पपई घरातच पिकवून खेड्यात विक्रीकरीत काही पैसे कमाविण्याची धडपड सुरु ठेवली आहे.शेतकऱ्यांवर संकट येणे हे नवीन नाही. अवकाळी पाऊस, रोगराई, दुष्काळ, बाजारात मिळणारा कवडीमोल भाव यामुळे शेतकरी नेहमी अडचणीत येतो. काही शेतकरी निराश होऊन टोकाचे पाऊल घेतात. शेतमाल फेकणे किंवा पीक उपडून टाकणे हा पर्याय निवडतात. येथे पपई उत्पादक रोकडे परिवार यांनी शासनाचे संचारबंदीचे नियम पाळत परिसरातील खेड्यात विक्री सुरू केली आहे. यात गर्दी होणार नाही. संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाते. वजन भाव यात वेळ न घालवता लवकर व्यवहार केला जातो. यामुळे शेतकºयाचा खर्च देखील निघत असून गरीबांना स्वस्त पपई मिळत आहे.दरम्यान दहा दिवसांच्या बंद काळात शेतकºयांना खते व कीटकनाशके न मिळाल्याने पिकांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील धान्य घरात आले पण कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने एकीकडे धान्य माती मोल ठरत असतांना शहरात माल संपल्याने धान्याचे भाव तीन पटीने वाढले आहेत. शेतमाल अत्यावश्यक सेवेत घेऊन विक्रीची व्यवस्था करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे