शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हेंद्रुण-मोहाडी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडजाई : धुळे तालुक्यातील हेंद्रुण ते मोहाडी रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडजाई : धुळे तालुक्यातील हेंद्रुण ते मोहाडी रस्त्यांची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. या रस्त्यावरुन पायी चालणेही कठीण झाले आहे. चालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी हेंद्रुण, मोघण, तिखी, रानमळा येथील ग्रामस्थांंनी केली आहे.धुळे तालुक्यातील हेंद्रुण, मोघण, तिखी, रानमळा आदी गावातील ग्रामस्थांना धुळे येथे जाण्यासाठी मोहाडीकडुन येण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. गावातील हजारो तरुण उदरनिर्वाहासाठी धुळे येथील एम.आय.डी.सी. येथे कामासाठी येतात. तसेच याच रस्त्याला डेडरगाव येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. महापालिकेने या परिसराला पर्यटनस्थळ घोषित केले आहे. याच रस्त्यावर विपश्यना ध्यान साधना केंद्र आहे. या केंद्रात भारतासह विदेशातून नागरिक ध्यानसाधना शिकण्यासाठी येतात. रस्ता खराब असल्याने या मार्गावर येण्यासाठी रिक्षावाले नाखुश असतात. मोहाडी ते हेंद्रुण गावापर्यंतच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. तीन ते चार फुटाचे मोठमोठे खड्डे मध्यभागी पडले आहेत. या रस्त्यावर मोटारसायकलसह चारचाकी वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. अनेकदा खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात घडतात. खड्ड्यात मोठया प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे व चिखल झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.