पिंपळनेर : सायकलस्वार अचानक मध्ये आल्याने, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पोलिसांचे वाहन उलटल्याची घटना पिंपळनेर-नवापुर आयटीआय कॉलेज वळणावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.नवापूरहून पिंपळनेरच्या दिशेने पोलीस वाहन (क्र.एमएच १८-एएफ ०१४९) येत होते. त्याचवेळी सायकलस्वार मध्ये आल्याने. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. तीन पल्टी खावून ते वाहन शेतात उलटले. त्यात कॉन्स्टेबल दिलीप बापु मोरे हे जखमी झाले.चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा होती. गाडीत दोन कर्मचारी असल्याचे समजते त्यांना ग्रामिण रुग्णालयात उपचार करुण पुढे हलविण्यात आले.पोलीस व्हॅनचे नुकसान झाले आहे. इतर नागरिक मदत करीत असतांना त्यांनाही पोलिसांनी अरेरावी केली केली. गाडीत दोन पोलीस कर्मचारी असल्याचे सांगत फक्त एकाच पोलीस कर्मचारी यांची तपासणी झाली. संबंधित पोलीसाची वैद्यकिय तपासनी करण्यात यावी अशी मागनी पी. एस. आय. हंडोरे यांच्या कडे केली. दरम्यान पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल असे पीएसआय हंडारे यांनी सांगितले.
पिंपळनेरला पोलीस वाहन उलटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 23:04 IST