शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 19:24 IST

शिवजयंती उत्सव : १ हजार ४०० कर्मचारी

ठळक मुद्देपोलिसांचा तगडा बंदोबस्तमिरवणुकीवर एलसीबीचा ‘वॉच’पोलिसांची साप्ताहीक सुटी रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शिवजयंतीनिमित्त शहरात होणारे विविध कार्यक्रम शांततेत होण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांचे लक्ष राहणार आहे़ शांतता कमिटीची बैठकसोमवारी साजरी होणाºया शिवजयंतीचे औचित्य साधून शहर वाहतूक शाखेच्या शेजारी असलेल्या हॉलमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती़ त्यात डीजे वाद्याला बंदी असल्याने कोणीही त्याचा आग्रह करु नये़ अनधिकृत विषयाबाबत परवानगी कोणीही मागू नये़ सर्वांनी कायद्याचे पालन करत शांततेत उत्सव साजरा करावा़ कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी़ वेळेचे बंधन सर्वांनी पाळणे गरजेचे राहिल़ कायद्याची चौकट कोणीही ओलांडू नये अशाही सूचना करत कायद्याचे पालन केल्यास पोलिसांकडून सहकार्य मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता़ पोलिसांचा तगडा बंदोबस्तशिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आणि सायंकाळी निघणारी मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे़ त्यानुसार बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२ पोलीस निरीक्षक, ५५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ४०० पोलीस कर्मचारी, ४०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड आणि एसआरपीएफच्या दोन कंपन्या याप्रमाणे तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़ मिरवणुकीवर एलसीबीचा ‘वॉच’शहरातील ज्या ज्या मार्गावरुन शिवजयंतीची शोभायात्रा, दुचाकी रॅली यासह लहान - मोठे कार्यक्रम होणार आहेत त्या सर्वांवर बारकाईने लक्ष केंद्रीत केले जाणार आहे़ स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे़ तशा प्रकारचे आदेश देखील त्यांना देण्यात आल्यामुळे त्यांच्या स्तरावर स्वतंत्र नियोजन आखण्यात येत आहे़ पोलिसांची साप्ताहीक सुटी रद्द शिवजयंती शांततेत पार पडावी आणि पोलिसांच्या बंदोबस्तात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या सुचनेवरुन सोमवारी पोलिसांची साप्ताहीक सुटी रद्द करण्यात आली आहे़ परिणामी पोलिसांना कर्तव्य बजवावे लागेल़