शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 19:18 IST

दोन ठिकाणी दिली धडक : गुरांसह गोमांस जप्त, तिघांविरुध्द गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने मिल्लत नगर आणि तेथून जवळच अशा दोन ठिकाणी सुरु असलेल्या कत्तलखान्यांवर धाड टाकली़ यावेळी गोमांस आणि गुरे जप्त करण्यात आली़ याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली़ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुबेर चवरे यांना शंभर फुटी रोड लगत असलेल्या मिल्लत नगर परिसरात कत्तलखाना सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पी़ ए़ शिरसाठ, एस़ बी़  आहेर, हेड कॉन्स्टेबल शंकर महाजन, पोलीस कर्मचारी संदिप कढरे, मुकेश पावरा, प्रेमराज पाटील, सुशील शेंडे यांना तातडीने पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले़ शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन वेगवेगळ्या वाहनांतून हा ताफा शंभर फुटी रोडलगत असलेल्या मिल्लतनगर भागात धडकला़ यावेळी आबीद शेख रशीद याच्या गोदामात गोमांस कापले जात असल्याचे निदर्शनास आले़ पोलिसांनी मांस कापणाºया तरुणास ताब्यात घेतले असता असलम खान अख्तर खान (२०, रा़ पूर्व हुडको, चाळीसगाव रोड, धुळे) असे असल्याचे सांगितले़ या ठिकाणी पोलिसांनी तीन महिलांसह ५० किलो गोमांस आदींसह १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ त्यानंतर पोलिसांचा हाच ताफा मिल्लतनगर परिसरातीलच अय्युब मुर्तुजा कुरेशी यांच्या गोदामात धडकला़ त्या ठिकाणाहून ३० किलो मांस जप्त करण्यात आले़ या ठिकाणी मांस कापताना आरिफ उस्मान कुरेशी (३६) हा तरुण आढळून आला़ ३० किलो मांस सह कुºहाड व लोखंडाचा सुरा असा एकूण ३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या दोघा कारवाई संदर्भात पोलीस कर्मचारी मुकेश पावरा यांनी फिर्याद नोंदविली आहे़ अस्लम खान अख्तर खान, आरिफ उस्मान कुरेशी या दोघांसह गोदाम मालक आबीद शेख रशिद या तिघांवर भादंवि कलम ४२९, २६९, २७८ यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी