पिंपळनेर : येथील भाजीबाजारात शुक्रवारी नागरिकांनी केली़ गर्दी आणि नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून आले़ कुठल्याही प्रकारचे विशिष्ठ अंतर दिसून आलेले नव्हते़ ही बाब लक्षात घेता पोलिस प्रशासनाने बाजार बंद करीत सर्वांना अक्षरश: घरी हाकलून लावले. यावेळी न ऐकणाऱ्या काहींना काठीचा प्रसाद देखील दिला़सध्या राज्यासह देशात गावागावात ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण लॉकडाऊन असून देखील शुक्रवारी येथील आठवडे बाजार असल्याने भाजीबाजार पिंपळनेर चिकसे रस्त्यावरील विद्यालय हायस्कूलच्या प्रांगणात भरवण्यात आला होता़ यामुळे नागरिकांनी भाजीबाजारात खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ २१ दिवसाच्या लॉकडाऊन पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्णयांची सर्वत्र पायमल्ली दिसून आली़ बºयाच नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हते़ तसेच भाजीबाजार विके्रते यांच्या तोंडालाही मास्क दिसून आले नाही़ सॅनीटायझरचा वापर कुठेही दिसून आला नाही़ शहरात शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने केवळ भाजी बाजारच भरलेला दिसून आला़ संपूर्ण परिसरात बाजार बंद असल्याने नागरिकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते़ यासंदर्भात बाजाराच्या पूर्वसंध्येला गावातून आवाहन करण्यात आले होते, त्यांनी भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, इतका मोठा भाजीबाजार भरला कसा? यावर नाराजी व्यक्त होत आहे़एका बाजूला देशाचे पंतप्रधान नागरिकांना घराबाहेर निघू नका, असे आवाहन करून देखील नागरिक मोठ्या संख्येने बाहेर निघत आहेत़ काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुळात इतकी गर्दी या संसर्गजन्य आजारात होणे चांगले नाही़ सदर बाजाराची वेळ ही एक वाजेपर्यंत देण्यात आली होती, शहरातील वाढती गर्दी भाजीबाजार खरेदी करण्यासाठी येत असल्याने लक्षात घेता पोलिसांनी त्वरित गर्दीला हाकलून लावले तसेच भाजीबाजार त्वरित उठविला़ गर्दी हटत नसल्याने पोलिसांना काही व्यक्तींवर काठीचा प्रसाद दिल्याने गर्दी ही त्वरित प्रसार झाली़ अप्पर तहसीलदार यांनी या घटनेची दखल घेता गर्दी होणार नाही तसेच दोघांमध्ये उभे राहताना अंतर न ठेवणाºया किराणा दुकानदार, भाजीविक्रेते यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी़नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मुळीच जाऊ नका, भाजीविक्रेता हा आपल्या गल्लीत कॉलनीत येत असेल तेव्हा भाजी घ्यावी, त्याचीही स्वच्छता लक्षात घ्यावी, घरात राहा, नियम पाळा, स्वत:ची काळजी घ्या, गर्दीत तुम्ही जाऊ नका आणि घरच्यांनाही कोणाला जाऊ देऊ नका, थोडे दिवस घरात आराम करा आणि ‘कोरोना’ या संसर्गजन्य आजाराला पळवून लावा,- डॉ.मिलिंद कोतकर, पिंपळनेर
पिंपळनेरच्या बाजारात गर्दी होताच पोलिसांनी हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 21:40 IST