शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील कारागृहात दरोड्याच्या शिक्षाबंदीवानाकडून पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 21:07 IST

साप्ताहीक तट संचार फेरी करत असताना घडला प्रकार

धुळे : जिल्हा कारागृहात साप्ताहीक तट संचार फेरी करत असताना दरोडा प्रकरणातील शिक्षाबंदी असलेल्या बंदिवानाने पोलीस अधिकाऱ्यांना मोठमोठ्या ओरडून शिवीगाळ करीत गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा आणल्याने त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा प्रकार १३ नोव्हेंबर रोेजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडला. दुपारी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. धुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दरोडा प्रकरणातील शिक्षाबंदी असलेला महेश प्रकाश पवार हा नाशिक कारागृहातून धुळ्यात एका दुसऱ्या प्रकरणासंदर्भात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने येणारे कोणतेही बंदिवान यांना स्वतंत्र्य ठेवण्यात येते. त्यानुसार महेश पवार याला धुळे जिल्हा कारागृहातील स्वतंत्र्य कोठडीत ठेवण्यात आले होते. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास धुळे जिल्हा कारागृहात पोलीस अधिकारी हे साप्ताहीक तट संचार फेरी करीत होते. त्यावेळेस शिक्षाबंदी असलेला महेश पवार याने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. मला स्वतंत्र्य कोठडीत का ठेवण्यात आले. अन्य बंदिवानाप्रमाणे मला एकत्र का ठेवण्यात आलेले नाही अशी विचारणा त्याने पोलीस अधिकाऱ्यांना केली. कोरोनाच्या अनुषंगाने असे केल्याचे व तात्पुरता असल्याचे त्याला सांगूनही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने शिवराळ भाषा वापरत गैरवर्तन केले. शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अंगावर देखील त्याने धावून येण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी तुरुंग अधिकारी दिपा वैभव आगे यांनी शहर पोलीस ठाणे गाठत १३ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शिक्षाबंदी असलेला महेश प्रकाश पवार याच्या विरोधात भादंवि कलम ३५३, १८८, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक एन. एस. आखाडे घटनेचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे