शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

धुळ्यात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 12:11 IST

मध्यरात्रीचा थरार : रमेशसिंह परदेशींनी पिस्तुलांतून गोळी झाडली

ठळक मुद्देपोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी धुळ्यात निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्यात्यांच्या आत्महत्यामुळे धुळे पोलीस प्रशासनाची मोठी हानीआत्महत्या मागचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी (५८) यांनी मध्यरात्री राहत्या घरी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडली़ त्यांच्या मेंदूच्या चिंधड्या उडाल्याने क्षणार्धात रक्ताच्या थाळोळ्यात ते पडले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू ओढवला़ त्यांची पत्नीही सोबत होती़ पण, काही कळायच्या आत त्यांचा अंत झाला़ दरम्यान, या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची सर्वात मोठी हानी झाली आहे़ पालेशा महाविद्यालयासमोर पोलीस अधिकाºयांचे निवासस्थान आहे़ यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह पोलादसिंह परदेशी यांचे निवास्थान आहे़ नाशिक येथील घरुन बुधवारी सकाळी ते धुळ्यात आले होते़ दैनंदिन काम आटोपल्यानंतर सुध्दा रात्री उशिरापर्यंत परदेशी यांचे काम सुरुच होते़ देवपुर आणि पारोळा रोड भागात त्यांनी रात्री पाहणी देखील केली होती़ कर्मचाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर ते आपल्या धुळ्यातील शासकीय निवासस्थानी आले़ मध्यरात्रीचा थरारबुधवारी मध्यरात्री स्वत:च्या पिस्तुलातून डोक्याला त्यांनी गोळी झाडली़ गोळी इतकी जोरात बसली की ती डोक्याच्या उजव्या भागातून निघत डाव्या बाजूला निघाली आणि भिंतीला आदळून समोरच्या भिंतीवर जावून धडकली़ पिस्तुलातून गोळी निघाल्यामुळे आणि रात्रीची शांतता असल्यामुळे आवाज मोठ्या प्रमाणात आला़ आवाज ऐकल्याने शेजारील अधिकारी घटनास्थळी धावले़ त्यावेळेस परदेशी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता़ वरिष्ठ अधिकारी घटनास्थळीरमेशसिंह परदेशी यांनी पिस्तुलांतून गोळी झाडत आत्महत्या केल्याची बातमी मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह अन्य अधिकारी तात्काळ दाखल झाले़ रुग्णवाहिकेच्या मदतीने परदेशी यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ त्यांना तपासून डॉ़ अरुणकुमार नागे यांनी मयत घोषीत केले़ शवविच्छेदन गृहात गर्दीहिरे वैद्यकीय महाविद्यालयातून परदेशी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात आणण्यात आला़ तेथे सोपस्कार पार पडल्यानंतर पुन्हा सिटीस्कॅन करण्यासाठी त्यांचा मृतदेह हिरे वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला़ डोक्याचे सिटीस्कॅन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात आणण्यात आला़ यावेळी राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते़ सेवानिवृत्तीचा शेवटचा टप्पारमेशसिंह परदेशी यांनी आपल्या पोलीस प्रशासनात अनेक पोलीस ठाण्यात आपल्या कार्याची छाप ठेवली होती़ सर्वात सुरुवातीला धुळ्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात ते प्रमुख पदावर विराजमान झाले होते़ त्यानंतर नंदुरबार शहर, जळगाव जिल्ह्यातील पहूर, निंबोरा, भुसावळ बाजारपेठ, मुंबई, जालना वाहतूक शाखा, बदलापूर, परतूर त्यानंतर धुळ्यातील देवपूर, आझादनगर पोलीस ठाण्याचे काम सांभाळल्यानंतर त्यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत नियुक्ती करण्यात आली होती़ मे महिन्यात ते निवृत्त होणार होते़ निवृत्तीचे अवघे तीन महिने शिल्लक असताना अशी विदारक घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे़  अकस्मात मृत्यूची नोंदबुधवारी रात्री मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक भरत काळे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली़ त्यानुसार, गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास धुळे शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी़ ए़ पाटील करीत आहेत़ सुशिक्षित परिवारत्यांचा परिवार सुशिक्षित आहे़ त्यांची पत्नी संगिता परदेशी असून मुलगी अमृता परदेशी ही ठाणे येथे वित्त लेखा अधिकारी या पदावर कार्यरत आहे़ तर मुलगा अमोल याचा हॉटेलचा व्यवसाय आहे़ नाशिकला अंत्यसंस्काररमेशसिंह परदेशी यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने नाशिकला हलविण्यात आले़ नाशिक येथील इंदिरा नगर, आत्मविश्वास सोसायटी, जानकी अपार्टमेंट, रत्नचक्र चौक येथून दुपारी १ ते दीड वाजेच्या सुमारास अंत्ययात्रा निघणार असल्याचे सांगण्यात आले़