शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दादा व दीदी आपल्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 11:51 IST

शिंदखेडा : पोलिसांचा अभिवन उपक्रम; मुलामुलींनी बिनदिक्कत समस्या मांडावी

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : शिंदखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत पोलीस दादा व पोलीस दीदी आपल्या दारी असा अभिवन उपक्रम राबविला जात आहे. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी पोलिस्टेशन अंतर्गत  ही मोहीम राबवली आहे.या मोहिमे अंतर्गत त्यांनी पोलिसस्टेशन मधील अपघाताचे रिपोर्ट, पी.एम. नोट, गुन्ह्यासंबंधित  कागतपत्र व इतर कागतपत्र ते स्वत: व कर्मचाºयांमार्फत घरी पोहोच करणार आहेत. युवकांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी कायमसरूपी पुरुष व महिला पोलिसांची नेमणूक पोलीस दादा व पोलीस दीदी म्हणून करून त्यांचे मोबाईल नंबर सर्व कॉलेज, शाळांना दिले आहेत. जेणे करून मुली व मुले आपली समस्या त्यांच्याकडे बिनदिक्कत सांगतील. पोलिसांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. यामुळे मुलींची होणारी छेडखानी रोखता येणार आहे. असे असले तरी शिंदखेड्यातील गुन्ह्यांकडेही गांभीर्याने बघावे, अशी मागणी होत आहे.शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस आपल्या दारी, हा उपक्रम सुरू केला आहे. याची अंमलबजावणी स्वत: पोलीस निरीक्षक तिवारी, पोलीस कॉन्स्टेबल बिपीन पाटील यांनी नुकतीच सुलवाडे येथील १९ वर्षीय युवती साक्षी मनोज भदाणे ही शेतात कपाशीला खत देतांना तेथील पडलेल्या इलेक्ट्रिक ताराला  स्पर्श होऊन जागीच  ठार झाली होती. तिचे पीएम रिपोर्ट, स्पॉट पंचनामा व खबरची नक्कल स्वत: सुलवाडे येथे जाऊन तिच्या वडिलांना सर्व कागदपत्र दिले. पोलीस स्टेशनचे मिलींद सोनवणे व तबसुन धोबी यांची पोलीस दादा व पोलीस दीदी म्हणून निवड केली आहे. आज किसान हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पोलीसांशी संपर्क साधावा  असे सुचीत केले. यावेळी पर्यवेक्षक एस.एस. पवार, पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Dhuleधुळे