शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम युवकांच्या कार्याची पोलीस दलाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:41 IST

माणुसकीचे दर्शन : पोलीस अधीक्षकांनी प्रमाणपत्र देवून केला सन्मान, सामाजिक सलोख्याचा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणू संसर्गास घाबरुन जिथे रक्ताचे नातेवाईक व जातीचे कुणीही साथ देण्यास पुढे आले नाही, अशावेळी परधर्माच्या युवकांनी माणुसकीची जाण ठेवून केलेल्या कार्याला पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत त्या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली़ पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांना बोलावून त्यांचा सन्मान देखील केला़९ मे रोजी धुळे शहरातील एका महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने ती मयत झाली होती़ या महिलेचे जवळचे नातेवाईक अंत्यविधीसाठी पुढे आले नाहीत़ त्यावेळी त्याच परिसरात राहणारे मुस्लिम युवक रईस हिंदुस्थानी, मसूद अहमद शब्बीर अहमद अन्सारी, अबु इकबाल अहमद अन्सारी, अबरार अहमद अन्सारी, अब्दुल नसीब अन्सारी, इम्रान अहमद अन्सारी, निहाल अहमद अन्सारी, फजलु रहेमान अन्सारी आणि रुग्णवाहिकेचा चालक अबुहरेरा अन्सारी यांनी स्वत: पुढाकार घेऊन कोरोना विषाणूबाबत सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेवून सदर मयत महिलेच्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून पुढाकार घेतला होता़ त्यानंतर हिंदू धार्मिक पध्दतीने अंत्यसंस्कार देखील पार पाडले़ या त्यांच्या कृतीतून त्यांनी हिंदू - मुस्लिम एकता आणि माणुसकी यांचे एक आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे़रमजान ईद सारख्या पवित्र सणाच्या दिवशी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी या युवकांच्या कार्याची दखल घेतली़ सोमवारी त्यांचा सन्मान केल्याने मदत करणारे युवक भारावून गेले होते़ प्रत्येकाला एक सन्मानपत्र देखील यावेळी देण्यात आले़ यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, हेड कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे, संजय पाटील यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते़दरम्यान, रमजानसारख्या पवित्र महिन्यात जात-धर्म बाजूला ठेवून आम्ही केवळ माणूस म्हणून कर्तव्य केले़ परंतु त्यास जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या कौतुकाच्या थापेमुळे यापुढे अशीच समाजसेवा करण्याकरीता मोठी प्रेरणा मिळाली, अशी भावना यावेळी सन्मानित झालेल्या युवकांनी बोलून दाखविली़ हिंदू-मुस्लिम एकतेकरीता आणि माणुसकीच्या रक्षणाकरीता भविष्यातही असेच कार्यरत राहू असा निर्धार या युवकांनी व्यक्त केला़

टॅग्स :Dhuleधुळे