शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये पोलीस अन् होमगार्डमध्ये झुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:50 IST

दिवसभर चर्चा : वशिलेबाजी होत असल्याचा नागरिकांचा आरोप

धुळे : शहरातील देवपूर भागात असलेल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये बुधवारी सकाळी पोलीस आणि होमगार्ड यांच्यात चांगलीच धुमश्चक्री झाली़ दिवसभर हा विषय चर्चेचा होता़ दरम्यान, स्वॅब तपासणीच्या ठिकाणी वशिलेबाजी होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला़सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वॅब तपासणीसाठी देवपुरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथील महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये गर्दी होत आहे़ सकाळपासूनच तपासणी करण्यासाठी रांगा लागलेल्या असतात़ अचानक एकाने येऊन थेट आतमध्ये प्रवेश केल्याने रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी हरकत घेतली़ एवढ्यावरच न थांबता नागरिकांनी बंदोबस्तावर असलेल्या होमगार्डला देखील टोकले आणि कोणीही मध्ये येतच कसे याची विचारणा केली़ यावेळी आपण पोलीस असल्याचे सांगत वाद घालण्यास सुरुवात केली़ अखेरीस नागरिकांच्या विरोधामुळे या पोलिसाला माघार घ्यावी लागली असलीतरी त्याने होमगार्डशी हुज्जत घालण्याचा केलेला प्रकार चुकीचा असल्याची चर्चा या ठिकाणी होती़तसेच रुग्णांच्या स्वॅब तपासणीत कोविड सेंटरमधील डॉक्टर आणि त्यांच्या सोबत असलेल्या स्टाफ हे वशिलेबाजी करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला़ अनेक नागरिक सकाळपासून स्वॅब तपासणीसाठी नंबर लावून उभे राहतात़ परंतु मध्येच कोणीतरी फोनवर बोलवले जाते आणि आतमध्ये सोडले जाते़ त्यातून हा वाद उदभवल्याची चर्चा याठिकाणी सुरु होती़ होमगार्ड आणि पोलिस यांच्यात झालेल्या वादाची चर्चा होती़ मात्र, पोलिसात नोंद नाही़

टॅग्स :Dhuleधुळे