शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा उताºयांच्या आधारे होणार पिकांचे पंचनामे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 22:14 IST

अक्कलपाडा वाढीव जलसाठ्याने नुकसान : साक्री तालुक्यातील शेतकºयांनी केला होता विरोध 

ठळक मुद्देनुकसान भरपाईसाठी लवकरच एकत्रित प्रस्ताव तापी पाटबंधारे महामंडळाकडे पाठविणारशेतकºयांच्या विरोधामुळे सर्वेक्षणाचेही त्रांगडे 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या पावसाळ्यात अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात वाढीव जलसाठा करण्यात आल्याने प्रकल्पास लागून असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरून झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आता सातबारा उताºयांनुसार करण्यात येत आहे. सर्व माहिती संकलित झाल्यानंतर नुकसान भरपाईबाबत एकत्रित प्रस्ताव लवकरच तापी पाटबंधारे महामंडळास सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षी आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पात प्रथमच ९० टक्के जलसाठा करण्यात आला होता. त्यामुळे हा साठा वाढत असताना प्रकल्पालगतच्या शेतांमध्ये पाणी शिरले. परिणामी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकºयांनी या नुकसानीच्या भरपाईची मागणी केली होती. परंतु पंचनामे करण्यास पोहचलेल्या कृषी सहायक, पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता व तलाठी यांना सैयदनगर, इच्छापूर येथे विरोध दर्शविल्याने पंचनामे होऊ शकले नव्हते. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेत नुकतीच या संदर्भात बैठक झाली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्याचवेळी होणे गरजेचे होते. परंतु शेतकºयांच्या विरोधामुळे त्यास उशीर झाल्याने शेतकºयांचे सातबारा उतारे मिळवून त्यावर नमूद पिकांच्या मूल्यांकनाद्वारे भरपाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कृषी व पाटबंधारे विभागाने कार्यवाही सुरू केली असून लवकरच एकत्रित प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. साक्री तालुक्यातील दातर्ती येथे प्रकल्पाच्या पाण्यामुळे डाळिंब पिकाचेही नुकसान झाले असून त्याचे पंचनामे सुरू आहेत. पुढील आठवड्यात ते काम पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. वाढीव जलसाठ्यामुळे झालेल्या नुकसानीचा फटका  प्रकल्पबाधित क्षेत्रातील सुमारे २००च्या वर शेतकºयांना बसला आहे. किती हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले याचा अंदाज अद्याप यंत्रणेला  बांधता आलेला नाही. प्रकल्पात यापुढे वाढीव जलसाठा केला जाणार आहे. यंदा ९० टक्के साठा करण्यात आला. त्यामुळे नजीकच्या शेतांमध्ये पाणी शिरले. तसे या पुढे होऊ नये, याकरिता आवश्यक ठरलेले भूसंपादन केले जाणार आहे. त्याचेही काम लागलीच हाती घेण्यात आले होते. ते झाल्यानंतर अंतिम रेषा मारून भूसंपादनाचा अंदाज आला असता. परंतु शेतकºयांनी विरोध केल्याने ते कामही पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता हे काम मॅन्युअली पूर्ण करण्यात येत असून ते झाल्यानंतर भूसंपादनाचा प्रस्ताव दिला जाणार आहे.