धुळे : येथील विजय पोलीस कॉलनीत दर वर्षाप्रमाणे यावर्षी देखील वृक्षारोप करण्यात आले़ कॉलनीचे चेअरमन धर्मराज महाजन, शांताराम काळे, श्रीकेश पाटील, प्रकाश पाटील, तयन पाटील, अजय अग्रवाल, ललित, संजय पाटील, भोलू पाटील, दिनेश गवळी, गौरव दशपूते, स्वामी चौधरी आदींनी २० रोपांची लागवड केली़ गेल्यावर्षी पिंजरे नसल्याने वृक्ष जगले नाहीत़ त्यामुळे यावर्षी मोठी रोपे लावली आहेत़ दहा वर्षांपूर्वी लावलेली लिंबाची झाडे आता मोठी होवून सावली देत आहेत़
विजय पोलीस कॉलनीत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:16 IST