शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 22:00 IST

उत्स्फूर्त सहभाग । ‘गुड मॉर्निंग, बी पॉझिटिव्ह’ ग्रुपचा उपक्रम

धुळे : येथील ‘गुड मॉर्निंग बी पॉझिटिव्ह’ ग्रुपतर्फे शनिवारी वृक्ष लागवड मोहिमेचे औचित्य साधून लळिंग येथे द. वा. पाटील हायस्कूलच्या प्रांगणात व किल्ल्याच्या पायथ्याशी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.गुड मॉर्निंग बी पॉझिटिव्ह ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम या शहरात अनेक वर्षांपासून सुरु आहेत़ शनिवारी लळिंग किल्ला येथे निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी ट्रेकिंगचे आयोजन ग्रुपतर्फे केले होते़ ग्रुपमधील वीस ते पंचवीस सदस्यांनी शनिवारी नवीन किल्ला येथे सकाळी साडेपाच वाजताच भेट देऊन चढाईस प्रारंभ केला़ तसेच लळिंग किल्ल्यावर स्वच्छता मोहिम राबवून वृक्षारोपण करण्यात आले़तदनंतर किल्ल्याच्या पायथ्याशी तसेच द़ वा़ पाटील शाळेच्या प्रांगणात सुमारे वीस वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी ग्रुपच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याबाबत जनजागृती करीत वृक्षारोपण करण्याचे आवाहन नागरिकांना केले़या मोहिमेत गु्रपचे सदस्य तथा मनपाचे सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे, भरत येवलेकर, चंद्रकांत सोनार आदींसह ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला़ कार्यक्रम यशस्वितेसाठी लळिंगचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वाघ यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मनोज वाघ, ओमप्रकाश खंडेलवाल कैलास मासाळ, रमेश वर्मा, रमेश सावंत, महेंद्र लगडे, कमल किशोर भट्टड, निरज वाघ, यश देवरे, आयुष खंडेलवाल, पंकज शर्मा, अनिल देवपूरकर, प्रदीप चव्हाण, कुणाल मासाळ, सचिन अग्रवाल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे