शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर-सुराय रस्त्यात पडला खड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 11:46 IST

संततधार पावसाचा फटका : आंतर मशागतीची कामे ठप्प, कापूस पिकावर मावा, तुडतुड्याचा प्रादूर्भाव

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर-सुराय रस्त्याची संततधार पावसामुळे पार दुरवस्था झाली आहे. गुरुकुल इंग्लिश स्कूलसमोरील फरशी पूल तुटला असून मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे हा रस्ता धोकेदायक बनला असून येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.मालपूरसह परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरु असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. २० जुलैच्या झालेल्या पावसामुळे येथील मालपूर-सुराय रस्त्यावरील सुराय चौफुलीजवळ गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या समोरील पाईप टाकलेला पूल अर्धवट वाहून गेला आहे. त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. मात्र, बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पुलावरील रस्ता सततच्या पावसामुळे अधिकच खचला असून रस्त्यात मोठा खड्डा पडल्याने हा रस्ता धोकेदायक बनला आहे.या रस्त्यावरुन सुराय-चुडाणे- अक्कलकोस तसेच खर्दे, वरझडी येथून दुधाची वाहतूक सुरु असते. तसेच शाळकरी मुलांची या रस्त्यावरुन वर्दळ सुरु असते. रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहन उलटून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळेस खड्डा निदर्शनास न आल्यास दुचाकीस्वार या खड्ड्यात पडण्याचा धोका आहे. बांधकाम विभागाने त्वरित येथे मुरुमचा भराव करुन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सुराय, चुडाणे, अक्कलकोस येथील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे