लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : येथील उपबाजार समितीत सोमवारी कांदा मार्केट सुरू झाले़ कांद्याचा १५६० रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला़ उद्घाटनानंतर ६० वाहनांचा लिलाव झाला़संपूर्ण खान्देशात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेली पिंपळनेर उपबाजार समिती दोन मार्च रोजी सुरू होऊन कांदा मार्केटचे उद्घाटन सभापती पोपटराव सोनवणे, संचालक त्र्यंबक भाऊराव सोनवणे, संचालक व्यापारी प्रतिनिधी गजेंद्र शांताराम कोतकर, सचिव अशोक मोरे, शाखा प्रमुख संजय बावा, ज्येष्ठ व्यापारी प्रभाकर कोठावदे, किरण कोठावदे, हेमंत कोठावदे, उमेश कोतकर, निलेश चौधरी, हर्षद काकुस्ते, दीपक बागड, अमोल पाटील, दिलीप भदाणे, बाळासाहेब घरटे, प्रवीण कोठावदे, बालूशेठ कोठावदे, दिलीप कोठावदे, पोपट धामणे, महेश भदाणे, अनिल कोठावदे, हरीश कोठावदे, लक्ष्मण पाटील आदी व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.उन्हाळी कांदा खरेदी करण्यात आल्याने बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले़ दिवसभरात ६० वाहनांचा लिलाव करण्यात आला यात कांद्याला पंधराशे साठ रुपये प्रति क्विंटल या दराने भाव देण्यात आला तर सरासरी भाव हा ८०० ते चौदाशे रुपये प्रतिक्विंटल असा होता, येणाºया काही दिवसांमध्ये उपबाजार समितीत शेकडो वाहन दाखल होणार असल्याने व्यापारी कांदा खरेदीसाठी सज्ज झाले आहेत़तसेच कांदा निर्यात खुली करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली़ सभापती सोनवणे यांनी येथील उपबाजार समितीत शेतकºयांसाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील असे आश्वासन दिले़
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 22:23 IST