शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळनेरला लाखोंची चोरी, ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 22:31 IST

गुन्हा नोंद नाही : गावात चर्चेला उधाण

पिंपळनेर : येथील मुरलीधर मंदिर जवळ एका घरात अज्ञात चोरट्यांनी सोने व पैसे चोरुन नेल्याची घटना घडली आहे़ चोरट्याने नेमके काय चोरले आहे, कितीची चोरी झाली या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत समजून आले नाही़ तर रात्री उशिरापर्यंत चोरीच्या गुन्ह्याची नोंद पिंपळनेर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती़ सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लोखंडी कोठीचे कुलूप तोडून रक्कम पसार केली असल्याचे बोलले जात आहे,मात्र विशेष बाब म्हणजे याबाबतची फिर्याद पोलिसात देण्यास घरमालक तयार नसल्याची चर्चा दिवसभर सुरु होती़ येथील मुरलीधर मंदिर जवळ एका घराचे बांधकाम सुरू होते़ त्या अनुषंगाने रोख रक्कम घरात जमा केलेली होती़ तसेच ऋषिपंचमी हरतालिका असा महिलांचा सण उत्सव असल्याने मुली, सून व सासू यांनी आपले दागिने सणाला वापरून हे दागिने कोठीत पैशांसोबत ठेवले होते असे समजते. मंगळवारी सकाळी घरातील मंडळी झोपेतून उठल्यानंतर त्यांना कुलूप तुटलेले व लहान मुलांचा पैशाचा गल्ला बाहेर पडलेला दिसला़ कोठी डोकावून पाहिले असता दागिन्यांची पेटी व रोख रक्कम चोरीस गेल्याचे घरातील व्यक्तींनी पत्रकारांना सांगितले़ पण पोलिसात गुन्हा दाखल केलेला नाही़ दरम्यान, चोरट्याला बहुधा कोणाकडे कितीचा ऐवज आणि कुठे ठेवला असेल याची माहिती असावी, त्यातून त्याने हातसफाई केली असावी अशी शक्यता व्यक्त होत आहे़पोलिसांकडे तपास केला असता सायंकाळी उशिरापर्यंत लेखी फिर्याद दाखल नसल्याने गुन्हा दाखल नसल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी ‘लोकमत’ला दिली़ चोरटा हा पाळीत ठेवणारा असावा अशी परिसरात चर्चा होती, चोरी होऊन देखील गुन्हा का दाखल केला नाही याचीच चर्चा मात्र दिवसभर पिंपळनेर गावात सुरु होती़

टॅग्स :Dhuleधुळे