धुळे : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातील पांझरा नदीवर झुलत्या पुलाचे बांधकाम मार्गी लावले जात आहे़ त्यावर शंकराची विलोभनीय मूर्ती उभारली असून या बांधकामासाठी ५ कोटी ४८ लाख ६१ हजार ६३५ खर्च येणार आहे़ साधारणपणे हे काम वर्षभरात पुर्णत्वास येईल, अशी माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले़ पांझरा नदीवरील झुलत्या पुलाचे कामाचा कार्यादेश आरंभ २९ आॅक्टोबर २०१८ आहे़ कामांची किंमत ५ कोटी ४८ लाख असलीतरी ५ कोटी ४८ लाख १४ हजार ८९ रुपये कमी दराने काम मार्गी लावले जाणार आहे़ झुलत्या पुलावरील पी १ आणि पी ३ पिअरचे काम प्रगतीपथावर आहे़ तर पी २ पिअरचे काम पूर्ण झाले आहे़ प्लॅटफॉर्मचे काम प्रगतीत असून दोन्ही बाजुकडील पायाचे खोदकाम पूर्ण झालेले आहे़ टप्प्या-टप्प्याने काम मार्गी लावले जात असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे़